विना भांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय
केटरिंग
सध्याच्या काळातला भरपूर नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे केटरिंग शिक्षण नोकरी ट्रेनिंग अशा अनेक कारणांनी घराबाहेर राहणार त्यांची संख्या वाढली आहे. रोज हॉटेलचं खाणं आरोग्य आणि किसा दोघांनाही परवडणारे नाही त्याच बरोबर व्यस्त जीवनशैलीमुळे अनेक नोकरी करणाऱ्या स्त्रिया अशा प्रकारच्या डब्यांना पसंती देत आहेत त्यामुळे घरगुती जेवणाच्या डब्याला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे याच बरोबर इडली उपमा पोहे साबुदाणा खिचडी मिसळ थाळी पीठ पराठे कसे न्याहारीचे पदार्थ किंवा चकली चिवडा शंकरपाळी लाडू अशा आठवणींचा पदार्थांनाही खूप मोठ्या प्रमाणावर मागणी असते तसेच सतत फास्ट फूडला कंटाळली त्यांच्या सतत चालणार्या विकेंड ट्रीप छोट्या छोट्या गेट-टुगेदर यासाठीही घरगुती खाद्य पदार्थांनाच पसंती देत आहेत त्यामुळे यापैकी कुठलाही पर्याय निवडून तुम्ही तुमचा केटरिंगचा व्यवसाय सुरू करू शकता.
फिटनेस क्लासेस
जर तुम्हाला फिटनेसची आवड असेल तर योगा एरोबिक्स झुम्बा अशा गोष्टी शिकवून त्याचे क्लासेस सुरू करू शकता अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अशा प्रकारच्या फिटनेस क्लासला जाणं पसंत करतात सध्या फिटनेस ला असलेले महत्त्व लक्षात घेता अशा प्रकारचे क्लासेस चांगला पैसा मिळवून देऊ शकतात याच्या जोडीला न्यूट्रिशन सल्लागार यासाठी असणारा एक कोर्स करून तुम्ही न्यूट्रिशन सल्लागार म्हणूनही काम करू शकता सध्या फिटनेस व या गोष्टींना प्रचंड महत्त्व आला आहे त्यामुळे या दोन्ही गोष्टी एका जागी उपलब्ध झाल्या तर त्याला मागणी येणारच
होममेड चॉकलेट व केक
हा व्यवसाय कॅटरिंगचा भाग नाही चॉकलेट आणि केक म्हटले की आबाल वृद्ध सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते पण बाजारातील चॉकलेट पेक्षा वेगवेगळ्या आकारांचे चॉकलेट व केक वाढदिवसापासून लग्नकार्यात पर्यंत अनेक कार्यक्रमात लक्ष वेधून घेतात चॉकलेट बुकेला तर प्रचंड मागणी आहे त्यामुळे चॉकलेट व केक मेकिंग चा क्लास सुरू करून तुम्ही त्याचा व्यवसाय चालू करू शकता किंवा त्याचे क्लासेसही घेऊ शकता दोन्ही मार्गांनी उत्पन्न मिळवून देणारा हा एक अतिशय चटकदार पर्याय आहे.
इंटेरियर डेकोरेशन
अनेकांना याबद्दल उपजतच ज्ञान असतो यासाठी खरं तर प्रोफेशनल कोर्स ची गरज असतेच असं नाही पण कोर्स केल्यास तुम्ही तुमची कलाकौशल्य अजून चांगल्या प्रकारे विकसित करू शकता तसेच कोर्स केल्यानंतर तुम्हाला या फिल्मसाठी कार्पोरेट क्षेत्राचे दरवाजे उघडे होतील नोकरी सांभाळून हा व्यवसाय करणे अवघड असलं तरी अशक्य मात्र अजिबातच नाही हे काम तुम्ही ऑफिस सुटल्यावर आता सुट्टीच्या दिवशी करू शकता.
कुकिंग क्लासेस
जागतिकीकरणामुळे विविध ठिकाणच्या खाद्य संस्कृतीने भारतीय जीवनात स्थान मिळविले आहे त्याचबरोबर पुरणपोळी साटोरी वडापाव उकडीचे मोदक असे पदार्थ तयार परदेशातही लोकप्रिय होत आहेत त्यामुळे पारंपारिक देशी-विदेशी अशा खाद्यपदार्थांचे क्लासेसही चांगलेच लोकप्रिय झाले आहेत तुम्हाला जर पाककलेचे आवड असेल तर असे क्लासेस तुम्ही सुरू करू शकता विना भांडवल व्यवसायाचे असे अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत.परंतु अनेक वेळा हे काय करायचं असं म्हणून या छोट्या पण चांगला नफा मिळवून देणारे व्यवसायाकडे दुर्लक्ष करतो पिझ्झा हट डोमिनोज यासारख्या फूड चेन सारख्या केक शोप ने आज भारतातल्या छोट्या शहरात आपले जाळे पसरायला सुरुवात केली आहे फिटनेस क्षेत्रांतील व्यक्तींना मोठे मोठे सेलिब्रिटी विशेष मान देतात ऋतुजा दिवेकर यांनी या क्षेत्रात काम करून स्वतःचं करिअर घडवले आहे कुठलेही काम सोपं असतं आणि कमीपणाचे नसतं जेव्हा ही गोष्ट तुम्हाला पटेल तेव्हा तुमच्या व्यवसायिक होण्याच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास सुरू होईल.
सुनील इनामदार, संग्रहक