National Consumer Day : राष्ट्रीय ग्राहक दिन हा 24 डिसेंबर रोजी भारतात अनेक ठिकाणी साजरा केला जातो व्यवसायासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहक हा व्यवसायाचा देव असतो असे मानले जाते इ.स. 1986 साली 24 डिसेंबर या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिलेली होती तेव्हापासून भारतात 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो हा कायदा अस्तित्वात यावा यासाठी अनेक संस्था आणि कार्यकर्त्यांना अनेक प्रकारचे प्रयत्न करावे लागले.
ग्राहकांना दिलेल्या अधिकारांचे आणि हक्कांचे संरक्षण व्हावे म्हणून यासाठी भारत सरकारने अनेक प्रकारच्या हेल्पलाइन सुद्धा चालविण्यात येत आहेत. ग्राहकांच्या तक्रारी करण्यासाठी केंद्र सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या हेल्पलाइनच्या 1800114000 या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही तक्रारी करू शकता. तसेच ग्राहक खाली दिलेल्या www.nationalconsumerhelpline.in या संकेतस्थळावर जाऊन देखील आपली तक्रार नोंदवू शकता.
ग्राहक संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला सहा हक्क मिळालेले कोणते
- सुरक्षेचा हक्क
- माहितीचा हक्क
- निवड करण्याचा अधिकार
- म्हणणे मांडण्याचा हक्क
- तक्रार निवारण करून घेण्याचा हक्क
- ग्राहक हक्कांच्या शिक्षणाचा अधिकार
ग्राहकांचे फक्त हक्क नसून काही कर्तव्य देखील आहे जसे की नेहमी उच्च गुणवत्तेचे उत्पादन घ्यावे ज्यांच्या बर एक मार्क असतात जे आपल्याला सुरक्षिततेची हमी देता त्या व्यतिरिक्त ग्राहकांनी फसवणूक झाल्यावर त्याची तक्रार निवारण केंद्रात द्यावी तसेच फसवणूक होत आहे समजल्यास त्याचा विरोध करावा आणि त्याच्या विरोधात तक्रार करावी.