Raigad fort information in Marathi : रायगड किल्ला हा एक भारताचा महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे इथे अलीकडे पर्यटकांच्या संख्येत बरीच वाढ झालेले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. महाराजांचे कर्तुत्व त्यांचा पराक्रम त्यांचे गौरवगाथा एकूणच महाराष्ट्रात मुल लहानाचे मोठे होताना आपण पाहत आहोत. महाराजांच्या किल्ल्यांची देखील माहिती आपणास असायला हवी. या किल्ल्यांचा इतिहास स्वराज्यात त्यांचे असलेले अस्तित्व किल्ल्याचे स्वरुप हे देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे तर आज आपण या लेखात महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
रायगड किल्ल्याचा इतिहास History of Raigad fort
किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्रसपाटीपासून सुमारे 820 मीटर (2,700 फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजी राजांनी रायगडाचे स्थान आणि महत्त्व पाहून इ. स. चे 16 शतक 16 व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली आणि शिवराज्याभिषेक या ठिकाणी झालेला आहे. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली होती. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाने संरक्षित स्मारक आहे.
रायगड किल्ल्याची माहिती Information about Raigad fort in Marathi
या किल्ल्याचे प्राचीन नाव रायरी होते. युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असेही म्हणत.
रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगांमध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला इ.सन 1674 मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केलेले आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे ची सुविधा असून त्यामुळे काही मिनिटांमध्ये किल्ल्यावरती पोहोचता येते.
रायगडावरील पाहण्यासारखी ठिकाणे What are the places to see on Raigad?
- पाचाडचा जिजाबाईचा वाडा
- खुबलढा बुरूज
- नाना दरवाजा
- मदार मोर्चा किंवा मशिद मोर्चा
- महादरवाजा
- चोर दिंडी
- हत्ती तलाव
- गंगासागर तलाव
- स्तंभ
- पालखी दरवाजा
- मेणा दरवाजा
- राजभवन
- राज्यसभा
- नगारखाना
- बाजारपेठ
- शिरकाई देऊळ
- जगदीश्वर मंदिर
- महाराजांची समाधी
- कुशावर्त तलाव
- वाघ दरवाजा
- टकमक टोक
- हिरकणी टोक
अशी ही गडावर पाहण्यासाठी महत्वाची ठिकाणे आहेत.
रायगड किल्ल्याची वेगवेगळी नावे What are the different names of Raigad fort?
रायगड या किल्ल्याला इतिहासामध्ये वेगवेगळ्या नावांनी संबोधले गेले आहेत ती नावे म्हणजे रायगड, रायरी, शिवलंका, देवगड, राजगिरी, रायगिरी, इस्लामगड, पूर्वेकडील जिब्राल्टर अशी या किल्ल्यांची अनेक नावे होती. पण आज हा किल्ला रायगड म्हणून ओळखला जात आहे.
रायगड किल्ल्याचे पाच दरवाजे कोणते What are the five gates of Raigad fort?
- महादरवाजा
- नागर्चना दरवाजा
- पालखी दरवाजा
- मेणा दरवाजा
- वाघ दरवाजा
रायगड ला कसे जायचे How to reach Raigad fort
मुंबई-गोवा मार्गावर महाड या बस स्थानकावरून रायगडला जाण्याकरता अनेक बसेस असतात बस स्थानका बाहेर खाजगी जीप गाड्या असतात किंवा आपल्या वाहनाने देखील रायगडला जाता येऊ शकते.
विमानाने
जर तुम्हाला विमानाने जायचे असेल तर जवळचे विमानतळ लोहगाव विमानतळ पुणे आणि छत्रपती शिवाजी महाराज मुंबई महाराष्ट्र ही आहेत.
टीप : तुमच्याजवळ रायगड किल्ल्या / Raigad Fort Information in Marathi बद्दल आणखी माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की टाका आम्ही ती माहिती आवडल्यास जरूर या लेखात बदल करू…