तुम्ही तर पाहत असाल की राज्यातील ग्रामीण भागातील अनेक देवस्थानांमध्ये पुढील वर्षाचे हे भाकित वर्तवण्यात हे एक प्रकारचे प्रथा अनेक गावांनी अजूनही चालू आहे. यावर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र ही भाकी ते ऐकण्यासाठी लोकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालेली असते.
यातीलच अनेक भाकिते काही प्रमाणात खरे ठरल्याचा अनुभव येत असल्याचे लोक सांगत असतात. या वर्षीही अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाचा धोका होईल असे भाकीत हे तालुका कर्जत येथील ग्रामदैवत गोदड महाराज यांच्या सवंत्सरीत वर्तविण्यात आलेली आहे.
तालुका कर्जत संत सद्गुरु गोदड महाराज यांच्या 60 वर्षाची सवंत्सरी लिहून ठेवलेली आहे. दरवर्षी ही गुढी पाडव्याच्या दिवशी त्यातील आगामी वर्षाचे काही पान उघडून त्याचे वाचन हे करण्यात येत असते. तसेच यावर्षी सुद्धा वाचन केलेले आहे. गेल्या दोन वर्षे पुजारी आणि निवडक भाविकांच्या उपस्थितीत हे वाचन झालेले होते मात्र यावर्षी भाकीत ऐकण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी त्या ठिकाणी झालेली होती. त्या ठिकाणातील गोदड महाराज मंदिराचे विश्वस्त पुजारी पंढरीनाथ महाराज काकडे यांनी या सवंत्सरीचे वाचन केलेले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की या वर्षी वादळी पावसामुळे राजा व प्रजा दोघेही त्रस्त होतील. आगामी वर्षामध्ये सर्वत्र चक्रीवादळ व वादळी वाऱ्यासह पाऊस पडून मोठ्या प्रमाणात नुकसान होईल.
अधिक माहिती पहा
पान – १
पान – २
पान – ३