मेथी कोफ्ता करी रेसिपी
- तुम्ही पहिल्यांदाच अशाप्रकारची मेथी कोफ्ता करी कशा प्रकारे करायचे हे आपण आज पाहणार आहोत ही सर्व माहिती खालील प्रमाणे –
साहित्य :
- कोफ्त्या करता
- मेथीची एक जुडी निवडून
- दीड वाटी बेसन
- ओवा दोन चमचे
- खाण्याचा सोडा चिमूटभर
- लाल तिखट तेल
- चवीनुसार मीठ
करीसाठी :
- तीन मोठे कांदे आलं लसून पेस्ट दीड चमचा
- गोड दही अर्धी वाटी
- एक टोमॅटो बारीक चिरून
- भाजलेले खोबरे अर्धी वाटी
- खसखस दोन चमचे
- शक्यतो ताजा गरम मसाला दोन चमचे
- छोट्या वेलचीचे दाणे भरडून
- दालचिनी पूड पाव चमचा
- पनीर किसून एक चमचा
- धने-जिरे दोन चमचे हळद
- कोथिंबीर
- तेल
- लाल तिखट
- चवीनुसार मीठ
कृती :
कोफ्ते
प्रथम मेथी बारीक चिरून बेसन ओवा तिखट मीठ सोडा इत्यादी एकत्र करून किंचित सैलसर पीठ भिजवावं
हातावर गोल गोळे थापून तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावे.
हेही वाचा : पुरणपोळी कशी बनवायची
करी
- कांदा बारीक चिरून किंचित भाजून घ्यावा मग खोबरं, खसखस, बडीशेप, गरम मसाल्यातल्या अर्ध्या वेलचीचे दाणे, धने-जिरे बाजूने सर्व मिक्सर मध्ये वाटून पेस्ट करावी.
- तेलात किंचित हळद आणि उरलेला गरम मसाला टाकून मिक्सर मधली पेस्ट घालावी
- लालसर रंग झाला की टोमॅटो तिखट दही टाकून परतावा आणि एक कप पाणी मीठ टाकावं
- ग्रेव्ही तयार झाली की कोफ्ते टाकावेत कोथिंबीर किसलेले पनीर व हवा असल्यास गरम मसाला अजून अर्धा चमचा टाकावा गरम मसाला ताजा असणे महत्वाचे आहे.
हे पाहू शकता तुम्ही आता तयार झाली आहे मेथी कोफ्ता करी एकदम वेगळी आहे त्यामुळे तुम्ही एकदम आवडीने खाऊ शकता. घरगुती व घरबसल्या तुम्हीही मेथी कोफ्ता करी तयार करू शकता व आपल्या कुटुंबाला खुश करू शकता.
हेही वाचा : इडली कशी तयार करायची