Wednesday, September 27, 2023
Homeinformationमुस्लिम बांधवांचा एक महत्त्वपूर्ण सण म्हणजे रमजान ईद माहिती मराठी Ramzan Eid...

मुस्लिम बांधवांचा एक महत्त्वपूर्ण सण म्हणजे रमजान ईद माहिती मराठी Ramzan Eid information in Marathi

Ramzan Eid: मुस्लिम बांधवांचे महत्त्वाचे दोन सण म्हणजे ईद-उल-फितर आणि ईदुज्जह. यातला ईद-उल-फितर हा आनंदाने साजरा करणारा मोठा सण आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात चंद्र दर्शन होईपर्यंत रोज उपवास केले जातात. 
सूर्य उगवण्यापूर्वी अन्नाच ग्रहण करायचे आणि नंतर संपूर्ण दिवस सूर्यास्त होईपर्यंत उपवास पाळायचं सूर्यास्त झाल्यानंतर नमाज करून प्रार्थना करावयाची आणि उपवास सोडयचा. असा हा नियम संपूर्ण महिनाभर पाळायचा या पवित्र दिवसांमध्ये कुरान शरीफ ग्रंथांचे वाचन करायचे वाचन केल्यानंतर चिंतन-मनन केली जावे असा नियम आहे. Ramzan Eid mahiti Marathi
मुस्लिम कॅलेंडर मध्ये चंद्र दर्शनाला महत्त्व असून चंद्र दर्शन झाल्यावर रमजान ईद संपूर्ण जगभरात साजरी केली जात असते. 3 मे 2022 रोजी ईद-उल-फितर म्हणजेच रमजान ईद साजरी होणार असे सांगितले जात आहे. ईद निमित्त खाद्यपदार्थाची रेलचेल असते. दूध, सुकामेवा आणि शेवया यापासून बनवलेल्या शिर खुरमा चे विशेष महत्त्व रमजान ईद दिवशी असते.
रमजान ईद माहिती मराठी  |  Ramzan Eid information in Marathi

रमजान ईदच्या दिवशी मुस्लिम धर्मातील महिला वर्गात हा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत असतो. पहिल्या-दुसऱ्या रोजा पासून घरात त्या शेवया तयार करायला सुरुवात करत असतात मात्र हे चित्र आता केवळ ग्रामीण भागातच आपल्याला दिसून येत आहे तसेच शहरी भागात सगळ्याच गोष्टी रेडीमेड मिळायला लागलेल्या आपल्याला दिसुन येत आहेत. ईदला आपल्या घराला रंगरंगोटी करून आप्त जणांना आपल्याकडे शीरखुर्मा खाण्यासाठी आमंत्रित केले जाते.

रमजान ईद दिवशी गळा भेटीला विशेष महत्त्व दिले जाते तसेच मुस्लीम बांधव यंदा उत्साहात साजरी करणार असून नमाज पठण केले जाईल चला तर मग आपणही आपल्या मुस्लिम बांधवांना ईद निमित्त मराठीतून शुभेच्छा देऊया.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments