महाशिवरात्री विषयी संपूर्ण माहिती मराठी Mahashivratri information in Marathi

Mahashivratri information in Marathi : हिंदू बांधवांचा एक पवित्र सण जो अतिशय भक्तीभावाने सर्वत्र साजरा करण्यात येतो तो म्हणजे महाशिवरात्री.

या दिवशी महाशिवरात्रीची एकादशी म्हणून उपवास केला जातो. काही लोक या दिवशी दिवसभर महादेवाचा जप करतात तर काही भागात लोक शिवरात्रीचा अगोदर 12 ज्योतिर्लिंगांना भेट देण्यासाठी जात असतात.

माघ महिन्यातील माघ कृष्ण/Magh Krishna चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला महा शिवरात्री / Maha Shivaratri असे म्हणतात. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा ही मोठी असते. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास धरत असतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी हा धरलेला उपवास संपवतात. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येत असतो. 

महाशिवरात्रीची पुराण कथा  Mahashivaratri story

ज्या वेळी समुद्र मंथन झाले त्यात सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली परंतु त्याचवेळी समुद्र मंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले. या विषात ब्रह्मांडाला नष्ट करण्यासाठीची ताकत होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवांमधेच होती त्यामुळे त्यांनी हे हलाहल विष प्राशन करून ब्रह्मांडाला वाचविले.
पण विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिवांना संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला. सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर गायन आणि नृत्याचे व्यवस्था सुद्धा केली. त्यामुळे सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्रि म्हटले जाते.

महा शिवरात्रि शुभेच्छा Happy Mahashivaratri

भगवान शिव यांचे आशीर्वाद नेहमी तुमच्या 
आणि तुमच्या कुटुंबासोबत राहुदे 
महा शिवरात्रीच्या शुभेच्छा.
भगवान महादेव तुम्हाला चांगले आरोग्य 
आनंद आणि समृद्धी देवो 
महा शिवरात्रीच्या शुभेच्छा 
महा शिवरात्रीच्या शुभदिनी तुम्हाला भगवान 
शिव यांचे सर्वोत्तम आशीर्वाद लाभू दे 
महा शिवरात्रीच्या शुभेच्छा.
Mahashivaratri Information Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment