महावीर जयंती माहिती मराठी mahaveer jayanti information in Marathi

Vardhaman mahavir Swami jayanti information in Marathi : महावीर जयंती जन्म तिथी चैत्र शुद्ध तेरा इसवी सन पूर्व 599 जन्मस्थळ वैशाली बिहार महावीरांचे नाव वर्धमान. आईचे नाव त्रिशला देवी वडिलांचे नाव सिद्धार्थ. आपल्या सनातन धर्म पैकी जैन धर्माचा पहिला तीर्थकर ऋषभनाथ आणि चोविसावा तीर्थकर महावीर हे फारच प्रसिद्ध पुरुष होऊन गेले. महावीर यांनी जैन धर्माचा खूपच प्रसार केला.

Mahavir jayanti images

भगवान महावीरांना वर्धमान, संन्मती, महावीर, वर्धमान, जितेंद्र या वेगवेगळ्या नावाने देखील ओळखले जात असत. त्यांच्या जन्मानंतर राज्यात खूप संपन्नता आणि वृद्धी झाली. त्यामुळे त्यांचे वर्धमान हे नाव ठेवण्यात आलेले होते. लहानपणापासून त्यांच्यातील सहस, तेज, बल त्यामुळे त्यांना महावीर अस म्हटले जात होते. आपल्या सगळ्या इच्छा आणि इंद्रियांवर त्यांनी विजय प्राप्त केल्यामुळे त्यांना जितेंद्र या नावाने ओळखण्यात आले.

जैनांचे 24 वे तीर्थकर भगवान महावीरांनी आपल्या शिकवणुकीतुन आणि उपदेशाच्या साहाय्याने लोकांना जीवन जगण्याची कला शिकविली. सत्य व अहिंसेचा सुद्धा त्यांनी लोकांना मार्ग दाखविला. भगवान महावीर यांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले. त्यांनी पूर्वी वैदिक काळातील पुर्वीच्या तीर्थकारांच्या अध्यात्मिक दार्शनिक आणि नैतिक शिकवण यांचा सुद्धा केलेला आहे.
हेही वाचा: 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment