Wednesday, September 27, 2023
HomeUncategorizedमहालक्ष्मी म्हणजेच गौरी पूजनाची माहिती l Jyeshtha Gauri Pujan

महालक्ष्मी म्हणजेच गौरी पूजनाची माहिती l Jyeshtha Gauri Pujan

महालक्ष्मी म्हणजेच गौरी पूजनाची माहिती 

महालक्ष्मी म्हणजेच गौरी पूजनाची माहिती

    गौरीपूजन व महालक्ष्मी पूजन हे हिंदू महिलांचे भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत आहे. महाराष्ट्रातल्या सणांपैकी एक सणही आहे. यास महालक्ष्मीपूजन असेसुद्धा म्हणतात.
    भाद्रपदात गणपती बाप्पांच्या आगमनानंतर काही दिवसांमध्येच घरोघरी गौराईचे आगमन होते. अर्थात ज्यांच्याकडे महालक्ष्मी पूर्वापार आहेत. किंवा नवसाने त्या स्थापित केलेल्या असतात अन्यथा कुणाकडे त्या पाहुण्या म्हणून देखील सुद्धा स्थापित केलेल्या असतात. काही ठिकाणी महालक्ष्मी म्हणून स्थापना करण्यात येतात तर काही ठिकाणी गौरी म्हणून या गौरींना गणपतीच्या बहिणी मानले जाते.
    अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्रीया भाद्रपद मासात गौरींचे पूजन करतात. तीन दिवस साजरा केला जाणार या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्ठीला ज्येष्ठा गौरीच्या आवाहन केले जाते. दुसर्या दिवशी पूजन व नैवेद्य तसे तिसऱ्या दिवशी विसर्जन करतात.
Jyeshtha Gauri Pujan
    गौराईचे आगमनापासून तर विसर्जनापर्यंत सगळं वेगळंच असतं. चैतन्यानं भरलेलं वातावरण असतं. तिचे आगमन होताना “कोण आल? ज्येष्ठाच्या घरी कनिष्ठा आली सोन्याची पावलं घेऊन घरा आली” असं म्हणण्याची परंपरा बर्याच गावी आपण पाहत असतो. देवता शास्त्रात तसेच सामाजिक जीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे.
    महालक्ष्मीचा सण हा कुलाचार म्हणून सर्व जाती जमातीतून श्रद्धापूर्वक पाळला जातो. शेती हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या घरांतून मात्र स्त्रिया धान्याचे राशी मांडून पूजा करतात. लक्ष्मी व गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा भूमीच्या सुफली करणाचा आहे.

गौरी पूजनाच्या वेळी म्हटले जाणारे गीते

आली आली लक्ष्मी, आली तशी जाऊ नको
बाळाला सांगते, धरला हात सोडू नको. 
मला आहे हौस चांदीच्या ताटाची 
लक्ष्मीच्या नैवेद्याला मुद साखरभाताची.
लक्ष्मीबाई आली सोन्याच्या पावलांनी 
ज्येष्ठच्या घरी कनिष्ठा आली 
मालकाच्या घरी लक्ष्मी आली.
गवराय आली गवराय आली 
कोणाच्या पावलानं? 
हळदी-कुंकवाच्या, हिर्या मानकाच्या
रुणझुणत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा 
आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा
    पूजेचा आणि महानैवद्याचा दिवस थाटामाटात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मात्र निरोपाची हुर हुर प्रत्येकाच्या मनात असते. कारण कोणालाही गौराईला निरोप देण्याची इच्छा नसते. तिच्या चैतन्यमयी सहवास सोडून तिचे विसर्जन कोणालाही करावेसे वाटत नाही. तरीदेखील रीतभात पाळत गौराईला दहीभाताचा आणि करंजीचा नैवेद्य दाखवला जातो. अक्षद वाहून पुनरागमनायच म्हणत ओटी भरून गौराईला निरोप दिला जातो.
महत्त्वाचं : तुमच्याजवळ आणखी महालक्ष्मी म्हणजेच गौरी पूजनाची माहिती असेल तर कमेंट मध्ये जरूर टाका आवडल्यास आम्ही जरूर ते या लेखात अपडेट करू…
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments