महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा माहिती मराठी MPSC Exam informatio in marathi
आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करत असाल तर जाणून घ्या त्यासंबंधी काही महत्त्वाची माहिती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) हे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असलेल्या वेगवेगळ्या सेवांसाठी आणि पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करण्याचे काम करते.
महाराष्ट्राचा रहिवासी नसलेल्या व्यक्ती राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा देऊ शकतो का
खुल्या सर्वसाधारण पदावरील म्हणजे आरक्षण नसलेल्या पदांसंदर्भात महाराष्ट्राचा रहिवासी नसलेला व्यक्ती सुद्धा परीक्षा देऊ शकतो.
MPSC Mahiti
आयोगामार्फत राज्यात खालील प्रशासकीय पदांच्या परीक्षा घेतल्या जातात.Examinations conducted by Maharashtra Public Service Commission
- उपजिल्हाधिकारी Deputy Collector
- पोलीस उपअधीक्षक Deputy Superintendent of Police
- तहसिलदार Tehsildar
- नायब तहसिलदार Deputy Tehsildar
- विक्री कर सहाय्यक आयुक्त Assistant Commissioner of Sales Tax
- सहाय्यक संचालक वित्त व लेखा विभाग Assistant Director Finance and Accounts Pal
- सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी Assistant Regional Transport Officer
- गट विकास अधिकारी Group Development Officer
- पोलीस उपनिरीक्षक Sub-Inspector of Police
- मुख्याधिकारी नगरपालिका नगरपरिषद Chief Officer Nagarpalika / Nagar Parishad
- उपमुख्य कार्यकारी अधिकारी Deputy Chief Executive Officer
- उपनिबंधक सहकारी संस्था Deputy Registrar Cooperative Society
इत्यादी यांसारखी महत्त्वाची पदे एमपीएससी MPSC द्वारे भरण्यात येतात.
परीक्षेसाठी अर्ज करण्याची पद्धत How to apply for MPSC exam
- एमपीएससी अधिकृत संकेतस्थळ www.mpsc.gov.in वर भेट द्या
- पुढील अधिसूचना शोधा आणि त्यावर क्लिक करा.
- त्याद्वारे पुढे जा आणि पात्रतेची आवश्यकता तपासा.
- आपण नवीन वापरकर्ता असल्यास नोंदणी करा किंवा अन्यथा आपली आयडी आणि पासवर्ड चा वापर करून तुम्ही लॉग इन करू शकता.
- आपल्या तपशिलासह फॉर्म सबमिट करा आणि अर्ज फी भरा.
राज्यसेवा परीक्षेचे तीन टप्पे आहेत
- पूर्व परीक्षा
- मुख्य परीक्षा
- मुलाखत
महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा कोण देऊ शकतो
महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा किमान पदवी पात्रता असणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनी देऊ शकतात. पदवीच्या अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी ( Students )सुद्धा परीक्षा देऊ शकतात मात्र मुख्य परीक्षा देत असताना पदवी पूर्ण असणे अत्यंत गरजेचे असते. कला वाणिज्य विज्ञान या व्यतिरिक्त अभियंता किंवा वैद्यकीय व्यावसायिक अभ्यासक्रमात पदवी सुद्धा मान्य केले जाते.