Maharashtra day information Marathi: महाराष्ट्र दिन महिती मराठी
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्राचे ज्या दिवशी राज्याची निर्मिती झाली तो दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जात आहे. 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे राज्यची निर्मिती झालेली आहे. या दिवशी महाराष्ट्रात प्रामुख्याने सर्व ठिकाणी सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरी करत असतात.
तसेच महाराष्ट्र दीन महाराष्ट्रातील सर्वच लोक हे मोठ्या उत्साहाने महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. तसेच या दिवशी म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या विषयी विविध कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा केले जाते तसेच महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.
1 मे रोजी महाराष्ट्र दिन तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो. तसेच युरोपात 1 मे हा दिवस मेपोल मध्ये हा काठी महोत्सव सुद्धा साजरा केला जातो. या दिवशी 1960 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची ही एक मुहूर्तमेढ रोवली गेलेली आहे. तसेच पंडितजींनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगल कलश दिला आणि नव्या महाराष्ट्राचे नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली होती.