प्रस्ताविक : ब्रिटिशांचे राज्य हिंदुस्तान स्थापन झाल्यानंतर देशात सामाजिक प्रबोधनाचा आधुनिकीकरणास सुरुवात झाली महाराष्ट्रातील प्रबोधनास 19 व्या शतकाच्या पूर्वार्धात प्रारंभ झाला विशेष म्हणजे महात्मा फुले लोकहितवादी जगन्नाथ शंकर शेठ यांच्या पासून सुरू झालेली प्रबोधन परंपरा अखंडपणे आजतागायत चालू आहे. समाज प्रबोधनाच्या या चळवळीतील अनेक व्यक्तींपैकी काही ठळक व्यक्तींचा थोडक्यात परिचय खाली करून दिला आहे.
1. जगन्नाथ शंकरशेठ/Jagannath Shankarsheth ( 1803 – 1965 )
जगन्नाथ शंकर शेठ हे मुंबईच्या व महाराष्ट्राच्या आद्य शिल्पकारांपैकी एक सर जे जे स्कूल ऑफ आर्ट, बॉंबे नेटीव्ह एज्युकेशन सोसायटी एलफिन्स्टन स्टुडंट्स लिटररी अंड सायंटीफिक सोसायटी, ग्रँट मेडिकल कॉलेज या संस्थांच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. स्री शिक्षणाचा पुरस्कार केला.
2.बाळशास्त्री जांभेकर/Balshastri Jambhekar ( 1812 – 1846 )
बाळशास्त्री जांभेकर हे दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राचे संस्थापक होत. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक व आद्य पत्रकार मानले जातात. त्यांनी विज्ञानप्रसारासाठी दिग्दर्शन या नावाचे मासिक सुरू केले स्त्री शिक्षण व विधवाविवाहाचे पुरस्कर्ते अनेक भारतीय भाषांत बरोबरच ग्रीक लॅटिन व फ्रेंच भाषा त्यांना अवगत होत्या.
3. गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी/Gopal Hari Deshmukh ( 1823 – 1892 )
लोकहित वादी हे समाजसुधारक होते त्यांनी प्रभाकर या साप्ताहिकातील लेखाद्वारे – शतपत्रे द्वारा जातीप्रथा, अंधश्रद्धा, कर्मकांड, बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथा, दैववाद, ब्राम्हणांचा दांभिकपणा यांवर कठोर टीका केली. स्त्री शिक्षण, प्रौढविवाह,विधवाविवाह यांचा पुरस्कार केला.
4. डॉ. भाऊ दाजी लाड/Dr. Bhau Daji Lad ( 1824 – 1874 )
डॉ. भाऊ दाजी लाड यांनी अनिष्ट सामाजिक रूढीना विरोध केला. स्री शिक्षण व विधवा विवाहाचे समर्थन केले. मादक द्रव्यांच्या सेवनाविरुद्ध मोहीम सुरू केली. स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेत पुढाकार घेतला.
5. विष्णु बुवा ब्रह्मचारी/Vishnu Buwa Brahmachari ( 1825 – 1872 )
विष्णु बुवा ब्रम्हचारी हे हिंदु धर्म व संस्कृतीचे अभिमानी होते. त्यांनी ख्रिस्ती जीवनव्रतिंच्या ख्रिस्ती धर्मप्रसाराला विरोध केला. सुखदायक राज्यप्रकरणी निबंध या पुस्तिकेद्वारे त्यांनी जमीन व संपत्ती यांच्या सामाजिक मालिकीचा व कल्याणकारी शासनाचा पुरस्कार केला.
6. महात्मा ज्योतिबा फुले/Mahatma Jyotiba Phule ( 1827 – 1890 )
महात्मा ज्योतिबा फुले हे धर्म व समाज सुधारणेबाबत मूलगामी विचार करणारे क्रांतिकारक व कृतिशील समाज सुधारक होते. मूर्तिपूजा, कर्मकांडे, ब्राह्मण – पुरोहितांचे वर्चस्व, जातिभेद आदी अनिष्ट चालींवर त्यांनी कठोर टीका केली. स्री – शिक्षण, बहुजन समाजाचे शिक्षण, दलितांचा उद्धार यांचा पुरस्कार केला. मुलींसाठी व दलितांसाठी शाळांची स्थापना केली. ते सत्यशोधक समाजाचे संस्थापक होते. शेतकर्याचा असुड, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी तसेच सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकांमध्ये त्यांनी आपले मूलगामी व क्रांतिकारी विचार व्यक्त केले आहेत.
7. सावित्रीबाई फुले/Savitribai Phule ( 1831 – 1897 )
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी फुल्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले. महात्मा फुले यांनी दलितांसाठी चालवलेल्या शाळेत त्यांनी अध्यापनाचे काम केले. तसेच त्यांनी अस्पृश्यता पाळण्याच्या रुढीला विरोध केला. महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाचे कार्य पुढे चालवले.
8.न्या. महादेव गोविंद रानडे/Mahadev Govind Ranade ( 1842 – 1901 )
न्या. रानडे यांचा प्रार्थना समाजा’ च्या स्थापनेत सहभाग होता. सामाजिक परिषद डेक्कन सभा या संस्थांचे संस्थापक होते. जात, वंश, धर्म, यांवर आधारित भेदांना व अंधश्रद्धेला त्यांनी विरोध केला. समता, बुद्धीनिष्ठता यांचा पुरस्कार केला. स्त्री – शिक्षण विधवाविवाह यांचा पुरस्कार केला.
9. नारायण मेघाजी लोखंडे/Narayan Meghaji Lokhande ( 1848 – 1897 )
नारायण मेघाजी लोखंडे हे महात्मा फुले यांचे निष्ठावंत सहकारी त्यांनी दिन बंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र सुरू केले तसेच गुराखी नावाचे दैनिकही काढले ते आपल्या नियतकालिकांतून शेतकरी व कामगारांची बाजू हिरीरीने मांडत त्यांनी मुंबईत पहिली कामगार परिषद भरवली व कामगार हिताच्या मागण्या मांडल्या बॉम्बे मिल हॅन्ड्स असोसिएशन हि भारतीय महिला कामगार संघटना त्यांनी स्थापन केली ते भारतातील कामगार चळवळीचे आद्य प्रवर्तक होते.
10. ताराबाई शिंदे/Tarabai Shinde ( 1850 – 1910 )
ताराबाई शिंदे या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील होते त्यांच्यावर सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव होता. 1882 मध्ये त्यांनी स्त्री-पुरुष तुलना हा निबंध लिहिला या निबंधात त्यांनी स्त्री-पुरुष समानतेचे अत्यंत प्रभावी असे प्रतिपादन केले आहे.
11. विष्णुशास्त्री चिपळूणकर/Vishnushastri Chiplunkar ( 1850 – 1882 )
एकोणिसाव्या शतकात स्वदेश स्वभाषा व स्वसंस्कृती याबाबत जागृती करणाऱ्यात विष्णुशास्त्री चिपळूणकर अग्रस्थानी होते. निबंध माला या आपल्या मासिकातून त्यांनी आपले विचार व्यक्त केले. लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकरांच्या सहकार्याने त्यांनी पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल स्थापन केले. व ते मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जातात.
12. गोपाळ गणेश आगरकर/Gopal Ganesh Agarkar ( 1856 – 1895 )
गोपाळ गणेश आगरकरांनी बुद्धिवादाच्या आधारे सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला आपल्या सुधारक या नियतकालिकातून त्यांनी आपले प्रागतिक विचार मांडून समाजात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जातिवाद, बालविवाह, अस्पृश्यता, विधवा केशवपन इत्यादी अनिष्ट प्रथांना त्यांनी विरोध केला त्यांनी ऐहिक दृष्टिकोन आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांवर भर दिलेला आहे.
.
13. महर्षी धोंडो केशव कर्वे/Maharshi Dhondo Keshav Karve ( 1858 – 1962 )
महर्षी कर्वे यांनी विधवाविवाह, स्त्री शिक्षण यांचा पुरस्कार केला. विधवाविवाहोत्तेजक मंडळ अनाथ बालिकाश्रम मंडळी या संस्था स्थापन केल्या. आपल्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी विधवेशी विवाह करून आपल्या विचारांना कृतीची जोड दिली. पुण्याजवळ हिंगणे येथे महिला विद्यालय सुरू केले. त्यागी समाजसेवक तयार करण्यासाठी निष्काम कर्म मठ स्थापन केला. स्त्रियांना मातृभाषेतून शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना केली.
14. पंडिता रमाबाई/Pandita Ramabai ( 1858 – 1922 )
पंडिता रमाबाईंनी स्त्रीशिक्षण, विधवाविवाह यांचा पुरस्कार केला. त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला होता. आर्य महिला समाज, शारदा सदन, मुक्ती सदन या संस्थांचे त्यांनी स्थापना केली. व त्याद्वारे स्री – यांच्या उन्नतीचे कार्य केले.
15. रमाबाई रानडे/Ramabai Ranade ( 1863 – 1924 )
रमाबाई रानडे या न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी होत. स्री – शिक्षणाच्या पुरस्कर्त्या होत्या. तुरुंगात असलेल्या स्त्रियांच्या हितांचे रक्षण करण्याचे रमाबाईंनी प्रयत्न केले. गरजू, निराधार स्त्रियांना शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहता यावे; म्हणून त्यांनी मुंबई व पुणे येथे सेवासदन या संस्था स्थापन केल्या. स्त्रियांना मताधिकार मिळावा यासाठी झालेल्या चळवळीत त्यांचासुद्धा एक प्रकारे सहभाग होता.
16. सयाजीराव खंडेराव गायकवाड/Sayajirao Khanderao Gaikwad ( 1863 – 1939 )
सयाजीराव हे बडोदा संस्थानचे प्रागतिक विचारांचे, जनहितैषी अधिपती होते. त्यांनी ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले. सक्तीचे प्राथमिक शिक्षण, गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या, बालविवाह ओपन व पडदा पद्धत यांवर बंदी, मिश्रविवाह व विधवाविवाह यांना पाठिंबा, अस्पृश्यता निवारण इत्यादी विषयात त्यांनी सुधारणांना चालना दिली. त्यांनी औद्योगिक शिक्षणासाठी कलाभवन स्थापन केले.
17. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे/ Maharshi Vitthal Ramji Shinde ( 1873 – 1944 )
महर्षी शिंदे यांनी प्रार्थना समाजाच्या कार्याला हातभार लावला. दलितोद्धाराच्या क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. त्यासाठी त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना केली. समाजातील अनिष्ठ चालींना त्यांनी विरोध केला. शेतकऱ्यांमध्ये जागृती करून त्यांना संघटित केले, तसेच शेतकऱ्यांच्या परिषदा ही संघटित केल्या.
18. राजर्षी छत्रपती शाहू महाराज/Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj ( 1874 – 1922 )
कोल्हापूरचे अधिपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बहुजन समाजाचे शिक्षण व दलितोद्वाराच्या क्षेत्रात महत्त्वाचे कार्य केले. मागास जातींची शिक्षणप्रसार करण्याबाबत त्यांनी जाहीरनामा काढला. अनेक मागास जातींतील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतीगृहे काढली. आपल्या राज्यात त्यांनी दलितांना मानवी स्वातंत्र्याचे हक्क दिले. सर्व सार्वजनिक इमारती, पाणवठे, विहिरी त्यांना खुल्या केल्या त्यांना नोकऱ्यात अग्रहक्क दीले. त्यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्याला आणि ब्राह्मणेतर चळवळीला मोलाची मदत केली.
19. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर/Swatantryaveer Vs. Da. Savarkar ( 1883 – 1866 )
सावरकर हे थोर क्रांतिकारक हिंदू राष्ट्रवादाचे आद्यप्रवर्तक, लेखक, कवी, वक्ता, समाजसुधारक, हिंदू समाज संघटनेचे पुरस्कर्ते होते. सर्व सामाजिक सुधारणांचे खंदे समर्थक व प्रचारक होते. हिंदू समाजाच्या दोषांवर, अंधश्रद्धांवर त्यांनी कठोर टीका केली. त्यांनी अस्पृश्यतानिवारण परिषदा भरवल्या. रत्नागिरी येथे त्यांनी सर्व जातींसाठी खुल्या असणाऱ्या पतीतपावन मंदिराची स्थापना केली. त्यांना समता, विवेकनिष्ठ, विज्ञाननिष्ठा व ऐहिकता यांवर आधारलेला नवहिंदू समाज निर्माण करायचा होता.
20. रघुनाथ धोंडो कर्वे/Raghunath Dhondo Karve ( 1882 – 1953 )
र.धों.कर्वे बुद्धीप्रामाण्यवाडी होते व ते आगामी काळाचा दूरद्रुष्टीने विचार करणारे होते. सुमारे ८० वर्षापूर्वी त्यांनी स्री मुक्तीला कारक ठरणाऱ्या संततिनियमनाचा निर्भयपणे पुरस्कार केला. संततीनियमन आणि लैंगिक शिक्षण या विषयांना चालना देणारे समाजस्वास्थ हे मासिक त्यांनी दीर्घकाळ चालवले. संततीनियमन या विषयावर त्यांनी 1923 मध्ये एक पुस्तकही लिहिले.
21. कर्मवीर भाऊराव पाटील/Karmaveer Bhaurao Patil ( 1887 – 1959 )
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याचे मोलाचे कार्य केले. यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली [ सातारा जिल्ह्यातील काले या गावी ( 1919 ) ] या संस्थेद्वारे त्यांनी दक्षिण महाराष्ट्रात खेडोपाडी शेकडो शाळांची स्थापना केली. गरीब विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका या योजनेद्वारे त्यांनी स्वावलंबी शिक्षणावर भर दिला. त्यासाठी त्यांनी वसतिगृहे काढली. यासाठी त्यांनी अपार श्रम केले. त्यांनी सत्यशोधक समाजाच्या कार्यातही योगदान दिले. श्रमप्रतिष्ठा, समता, बंधुभाव या मूल्यांवर त्यांचा भर होता.
22. डॉ. बाबासाहेब आंबेडकर/Dr. Babasaheb Ambedkar ( 1891 – 1956 )
डॉ. आंबेडकर हे क्रांतीकारी समाजसुधारक व भारतातील दलितांचे सर्वात थोर नेते होते. शिकून व संघर्ष करून दलितांनी आपले हक्क मिळावेत ही त्यांची शिकवण होती. दलितांच्या उन्नतीसाठी त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्था स्थापन केल्या मूक नायक, बहिष्कृत भारत या वृत्तपत्राने द्वारे त्यांनी दलितांच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी दलितांच्या हक्क प्रस्थापनेसाठी महाडचा चवदार तळे सत्याग्रह नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन संघटित केले. दलित मुक्तीचा क्रांतिकारी मार्ग म्हणून अखेरीस त्यांनी आपल्या हजारो अनुयायांसह हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
23. बाबा आमटे/Baba Amte ( 1914 – 2008 )
कृष्ठरोग्याची सेवा व पुनर्वसन या क्षेत्रांतील वैशिष्ट्यपूर्ण कार्यासाठी बाबा आमटे हे सर्वदूर परिचित आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे आनंदवन या नावाची कृष्ठरोग्यांची वसाहत त्यांनी स्थापन केली. त्यांनी कुष्ठरोग्यांचा आत्मविश्वास जागवून त्यांना आत्मनिर्भर केले. आदिवासी सेवा, पर्यावरणरक्षण, राष्ट्रीय एकात्मता, धरणग्रस्तांच्या समस्या यांसाठी त्यांनी कार्य केले. पदमविभूषण टेम्पल्टन व मॅगसेसे पुरस्कारांसह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
24. अण्णा हजारे/Anna Hazare ( 1940 )
अण्णा हजारे हे अहमदनगर जिल्ह्यातील राळेगाव सिद्धी या गावातील अभिनव ग्रामविकास कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. पाणी आडवा – पाणी जिरवा या तत्त्वाच्या आधारावर त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवला आणि या गावातील शेती ओलिताखाली आणली. तसेच त्यांनी सामाजिक वनीकरण प्रकल्प राबवला. या प्रयोगाबरोबरच त्यांनी हुंडाबंदी, दलितोद्धार, अंधश्रद्धानिर्मूलन, सामुदायिक विवाह, शिक्षणप्रसार या अंगांनीही कार्य केले आहे. ग्रामविकासाचा त्यांनी दाखवलेला हा मार्ग एक आदर्श मार्ग म्हणून ओळखला जातो. त्यांना मॅगसेसे पुरस्कार या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेले आहे.
25. डॉ. बाबा आढाव/Dr. Baba Adhav ( 1930 )
डॉ. बाबा आढाव हे समाजवादी परिवारातील आहेत.दलित, भटक्या व विमुक्त , कष्टकरी समाजगट यांच्या कल्याणाच्या अनेक आंदोलनात त्यांनी पुढाकार घेतला आहे. एक गाव, एक पाणवठा हे आंदोलन त्यांनी संघटित केले. देवदासी पुनर्वसन, आदिवासी व कष्टकरी स्त्रीयांचे आंदोलन, आणीबाणी 1975 – 77 विरुद्ध आंदोलन, मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन, धरण विस्थापितांचे पुनर्वसन, अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी चळवळीत त्यांनी पुढाकार घेतला आहे. पुणे येथे त्यांनी हमालांसाठी हमाल भवन ही वास्तू बांधली/उभारली आहे. पुरोगामी सत्यशोधक या त्रैमासिकाचे या मासिकाचे ते संपादक आहेत.