महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व भूरचना खालीलप्रमाणे
आपण आता कोकण किनारपट्टी ची माहिती पाहणार आहोत
कोकण पश्चिमेस अरबी समुद्र व पूर्वेस सह्याद्री, आणि उत्तरेस दमण गंगेचे खोरे व दक्षिणेस तेरेखोल खाडी यांच्या दरम्यान चा सुमारे 720 किलोमीटर लांबीचा पन्नास ते शंभर किलोमीटर रूंदीचा प्रदेश, आहे म्हणजेच कोकण किनारपट्टी होय. सह्याद्रीच्या रांगा दक्षिणोत्तर पसरलेल्या आहेत. आणि काही रांगा पूर्व – पश्चिम पसरलेले आहेत.
तर समग्र कोकण पट्टीच्या अरुंदपणामुळे या काही भागातील अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांची लांबी फार कमी आहे. तसेच अनेक कोकणपट्टी च्या जमिनीचा उतार हा ( पूर्वेकडून पश्चिमेकडे ) तीव्र असल्यामुळे पावसाळ्यात या नद्या वेगाने वाहतात आणि या नद्या जाऊन समुद्राला मिळतात. या नद्यांचे पाणी साठवण्याची व्यवस्था नसल्याने कोकण विभागात पावसाळा सोडून पाण्याची नेहमी त्रायांना टंचाई राहते. आणि पाण्याच्या प्रचंड वेगामुळे या नद्यांच्या मुखांशी खाड् तयार झालेल्या आपल्याला दिसून येत आहेत. वसई, ठाणे, धरमतर, दाभोळ, जयगड, राजापूर, विजयदुर्ग व तेरेखोल या कोकणातील प्रमुख खाड्या होत्या व आहेत.
आता सह्याद्री किंवा पश्चिम घाट
महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्यावर समांतर व दक्षिणेला पसरलेली पर्वत रांग म्हणजे सह्याद्री किंवा पश्चिम घाट होय. सह्याद्रीची समुद्रसपाटीपासूनची उंची ही सुमारे नऊशे ते बाराशे दरम्यान आहे या पर्वताच्या काही रांगा पश्चिमेकडून पूर्वेस विस्तारलेल्या आहेत.
आपण आता सह्याद्रीच्या चार प्रमुख रांगा पाहणार आहोत.
- सह्याद्रीच्या चार प्रमुख रांगा :
- सात माळा चे डोंगर हे नाशिक जवळ आहे
- अजिंका डोंगर हे औरंगाबाद आणि जळगाव जवळ आहे
- बालाघाट डोंगर अहमदनगर बीड परभणी नांदेड
- महादेवाचा डोंगर सातारा
सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर ते आता आपण पाहू
- सह्याद्रीतील सगळ्यात उंच शिखर हे कळसुबाई अहमदनगर व नाशिक या जिल्ह्याच्या सीमेवर आहे व याची उंची 1646 मीटर आहे
- साल्हेर 1567 मीटर
- महाबळेश्वर 1438 मीटर
- हरिश्चंद्रगड 1428 मिटर
- सप्तशृंगी 1416 मिटर
- तोरणा 1404 मीटर
- त्र्यंबकेश्वर 1304 मीटर
आता खाली सह्याद्रीची वैशिष्ट्ये आहेत
- त्र्यंबकेश्वरचा डोंगर
- माथेरानचा डोंगर
- महाबळेश्वरचे पठार
तर आता आपण देश व कोकण यांना जोडणारे सह्याद्रीतील महत्त्वाचे घाट पाहणार आहोत
- थळ कसारा घाट मुंबई – नाशिक
- माळशेज घाट ठाणे – अमदनगर
- बोर / खंडाळा घाट मुंबई – पुणे
- आंबेनळी घाट महाबळेश्वर – महड
- कुंभार्ली घाट कराड – चिपळूण
- आंबा घाट कोल्हापुर – रत्नागिरी
- फोंडा घाट कोल्हापूर – पणजी
- आंबोली घाट बेळगाव – सावंतवाडी
तर वरील प्रमाणे घाटाशिवाय नानेघाट, पार घाट, अनुस्कुरा घाट जवळ जवळ सुमारे दोनशे घाट घाटवाटा देश व कोकण यांना जोडलेल्या आहेत. फिरस्ते, डोंगरदऱ्यांत फिरणारे गिर्यारोहक घाटवाटा या उपयुक्त ठरलेले आपल्याला दिसून येतात.
महाराष्ट्र पठार ची माहिती पाहणार आहोत
सह्याद्रीच्या पूर्व महाराष्ट्र पठार दख्खनच्या पठाराचा भाग बसलेला आहे. हे पठार उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगा असून दक्षिणेकडील कृष्णा नदीच्या खोऱ्यात पर्यंत विस्तारलेले आहे. या पठारावर अनेक हे लहान पठारे व गोदावरी, भीमा व कृष्णा नद्यांची खोरी आहेत. सातपुडा पर्वतरांग यांना अमरावती जिल्ह्यात गाविलगड म्हणतात. तर नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ म्हणतात. या पठाराची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची ही पश्चिमेकडून 900 मीटरपासून पूर्वेस व वैणगंगा खोरे 300 मीटर पर्यंत उतरत गेलेली आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना अनुक्रमे सातपुडा पर्वत, तापी पूर्णा खोरे, सातमाळा अजिंठा डोंगर, गोदावरी खोरे, हरिश्चंद्रगड बालाघाट डोंगर, भिमा खोरे, महादेवाचा डोंगर व कृष्णा खोरे पठारी प्रदेशाची मांडणी आहे
महाराष्ट्राची भूरचना
महाराष्ट्राचा सुमारे 90 टक्के भूभाग बेसॉल्ट म्हणजेच अग्निजन्य खडक आणि बनलेला आहे आणि जर पाहिलं गेलं तर पूर्वीच्या काळात महाराष्ट्राचा प्रदेश भूकंपप्रवण मानला जात नव्हता परंतु 1967 मध्ये कोयना परिसरात भूकंप झाला. तसेच 1993 मध्ये किल्लारी लातूर येथे भूकंप झाला. यामुळे महाराष्ट्राचा बहुतेक भाग भूकंपप्रवण क्षेत्रात असल्याचे मानले जाते.