मराठी चारोळी / Marathi Charoli
१. चंद्र
चंद्राच्या मिलनास आज कुणीतरी तरसत होतं
तरीच अंगणात माझ्या आज चांदणं बरसत होतं !
२. चोरी अशीही
एकाकी जीवनात येऊन
शिरजोरी केली होतीस
काळीज हिरावुन माझं
तु चोरी केली होतीस !
३. नॉट रिचेबल
फोन केला जेव्हा जेव्हा
त्याचा फोन बंद होता
अन म्हणे त्याला
माणसं जोडन्याचा छंद होता !
४. प्रेम
खुप प्रेम दिलंस तरी
पुरत काही नाही
अन तुझ्यावाचुन जगायचं तर
उरत काही नाही !
५. आई
देव्हार्यातील पणती सुद्धा
आसवं गाळुन रडते
जेव्हा लेकरासाठी माय त्याची
जेवल्याविना निजते !
६. विठला ..
हरिनाम घेता विठला
मी भक्तीभावे भिजतो
मज संकटसमयी माझ्या
पाठीशी पांडुरंग दिसतो !
७. आई
माय सुखी राहो देवा
किमया तुझी अशी कर
बाकी मज नको काही
आईस दिर्घायुषी कर !
शब्द – वैभव पवार
Instagram – its_vaibhav_here