मद्यपानामुळे काय दुष्परिणाम होतात?
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे खरे असले तरी बोलताना चालताना सारखेच अडखळणाऱ्या दारुड्या च्या बाबतीत मात्र हे स्पेशल खोटे ठरते मध्यपन करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत तरुण वयातच या दारूचे व्यसन लागते पिक्चर मधील हिरो चे अनुकरण मित्रांचा प्रभाव कुतूहल नावीन्याची आवड सहाशे वृत्ती मानसिक अस्थिरता अशा अनेक कारणांमुळे लोक मद्यपानाला सुरुवात करतात एकदा सुरुवात केली की मग त्याला मर्यादा राहत नाही.
आरोग्यावर मद्यपानाचे अनेक दुष्परिणाम होतात यात यकृताचा कर्करोग मधुमेह सारख्या रोग लवकरच होणे, रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होऊन हृदयाला रक्त पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होणे व हृदयविकाराचा झटका येणे हे रोग दिसून येतात. मद्यपान केलेल्या व्यक्तीचे स्वतःवर नियंत्रण नसते त्यामुळे असे लोक अपघातात सापडतात व मृत्युमुखी पडतात.
दारू पिण्याचे नुकसान
मद्यपानाचे आरोग्य खेरीज सामाजिक व आर्थिक परिणाम हे फार होतात. घरे उद्ध्वस्त होतात, नातीगोती तुटतात, आर्थिक विपन्नावस्था येथे दारू पिऊन व्यक्ती पत्नीला मुलांना मारहाण करतो, घराकडे त्या व्यक्तीचे दुर्लक्ष झाल्याने मुलांचे शिक्षण नीट होत नाही सहाजिकच मुले अशिक्षित राहतात. समाजात बेरोजगारी वाढते व गुन्हेगारीच्या प्रमाणातही वाढ होते.
दारूमुळे यकृत खराब होते आता पायांवर सूज येते पोटात पाणी होते मेंदूवर परिणाम होऊन मानसिक रोग होतात अशी ही सार्वजनिक दारू आधी माणूस दारू पितो व नंतर हळूहळू ती त्याला त्याच्या घरदार देऊन टाकते (संपवते) हे म्हणतात ते खरेच आहे त्यामुळे मद्यपानाच्या सवयीने पासून दूर राहिलेलेच चांगले.