ब्रेन ट्युमर म्हणजे काय?
ब्रेन म्हणजे मेंदू व ट्यूमर म्हणजे अनैसर्गिक वाढ होऊन निर्माण झालेली गाठ मेंदूच्या पेशींच्या अनियंत्रित अनैसर्गिक अशा वाढील ब्रेन ट्यूमर असे म्हणतात ही गाठ साधी अथवा कर्करोगाचे असू शकते.
मेंदूत शरीरातील सर्व जाणिवांचे संदेश देत असतात व त्यावर आदेशही दिले जातात. श्वसन रक्ताभिसरण शरीरात तोल राखणे हालचाली करणे अशा सर्वच महत्त्वाच्या क्रियांचे नियंत्रण मेंदूतील केंद्रामार्फतच होते. या बाबींमुळे मेंदूत येणारी गाठ व ट्यूमर हा खूप गंभीर विकार समजल्या जातो. येथे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की मेंदूचे काही ट्यूमरचे शस्त्रक्रिया करून मुळापासून काढून टाकता येतात. त्यांचा कोणताही परिणाम नंतर दिसत नाही.
ब्रेन ट्युमर कैसे होता है.
ब्रेन ट्यूमर म्हणजे शरीरातील एखादा भागातील संवेदना नष्ट होणे, स्नायू शिथिल होणे, निष्क्रिय होणे, झटके येणे, चक्कर येणे, डोके दुखणे अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे अशी लक्षणे असलेल्या मेंदूची सिटीस्कॅन सारख्या उपकरणाने तपासणी करून घेणे आवश्यक असते. ब्रेन ट्यूमरचे निदान लवकर झाले तर तो काढणे अशक्य होते व त्यामुळे व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. निदान व्हावयास खूप उशीर झाला तर मात्र शस्त्रक्रिया अवघड होते. व रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होतो. तसेच शस्त्रक्रियेनंतर हात व पाय लुळे पडू शकतात.
ब्रेन ट्यूमर च्या शस्त्रक्रिया सुदैवाने महाराष्ट्राच्या सर्वच प्रमुख शहरात आता होऊ लागल्या आहेत. हृदयाच्या शस्त्रक्रिया पेक्षा याचा खर्चही बराच कमी असतो. त्यामुळे सर्वसामान्य लोक आता याचा फायदा घेऊ शकतात.