Wednesday, September 27, 2023
HomeFortप्रतापगडाची संपूर्ण माहिती मराठी Pratapgad fort information in marathi

प्रतापगडाची संपूर्ण माहिती मराठी Pratapgad fort information in marathi

Pratapgad Fort Information In Marathi : प्रतापगड हा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी केलेल्या पराक्रमाचा येतो गाथा आपण इतिहासात वाचत आलेलो आहोत. आज देखील महाराजांच्या पराक्रमाची आणि शौर्याची आणि त्यांच्या गनिमी काव्याची आठवण करून द्यायला पुरेश्या आहेत. महाराजांनी केलेल्या पराक्रमावर अनेक कवण, गीत, पोवाडे रचले गेलेले आहेत. ते एकताना देखील आपल्या अंगावर शहारे येतात आणि त्या वेळी महाराजांनी जो प्रसंग कशा पद्धतीने निभावून नेला असेल या कल्पनेत आपण ध्यानमग्न होतो. प्रतापगड वरील महाराजांची आणि अफजलखानाची भेट देखील इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरण्यात आली आहे. त्या भेटीवर पोवाडे देखील गायले गेले आहेत. तर आपण प्रतापगड किल्ल्याची माहिती आज आपण लेखात पहाणार आहोत.

प्रतापगड किल्ल्याची माहिती / Pratapgad fort information in marathi

  • किल्ल्याचे नाव : प्रतापगड 
  • किल्ल्याची उंची : 3556 फूट 
  • किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग 
  • चढाईची श्रेणी : अत्यंत सोपी 
  • ठिकाण : सातारा, महाराष्ट्र 
  • जवळचे गाव ; महाबळेश्वर, आंबेनळी घाट 
  • डोंगररांग ; सातारा 
  • सध्याची अवस्था : व्यवस्थित
History of Pratapgad fort
वाहन तळावरून गडाच्या दक्षिणेस टेहळणी बुरुजा खालून सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपण थोड्या वेळातच तटबंदीत लपविलेल्या पश्चिमाभिमुख महादरवाजा येऊन पोहोचतो वैशिष्ट्य म्हणजे शिवकालीन रितीप्रमाणे आजही हा दरवाजा सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो महादरवाज्यातून आत गेले की उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरुज आहे हा बुरुज पाहून परत पायर्‍यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते मंदिरात भवानीमातेची प्रसन्न मूर्ती आहे हि मूर्ती महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शाळिग्राम शिळा आणून त्यातून घडवून घेतलेली आहे या मूर्ती शेजारीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व श्री सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे.

प्रतापगड किल्ल्यावर कसे जायचे  How to reach Pratapgad fort

प्रतापगडाला जाण्यासाठी जवळचे ठिकाण महाबळेश्वर जिल्हा सातारा उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस 08 मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या डोपर्या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झालेली आहे महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते.
महाबळेश्वर पासून महाड रस्त्याला 21 किलोमीटर अंतरावर प्रतापगड आहे दिनांक 10 नोव्हेंबर 1659 रोजी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्यात सर्वात मोठी लढाई झाली होती. त्यामुळे या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. सन 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची स्थापना केली.

प्रतापगड किल्ल्यावर काय पहाल What to see on Pratapgad fort

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे कोणती 
  • अब्जल खान यांचे थडगे 
  • प्रवेशद्वार 
  • देवी भवानी मंदिर 
  • शिवाजी महाराजांचे स्मारक

प्रतापगडावर जाण्यासाठी उत्तम वेळ कोणती What a great time to visit Pratapgad

प्रतापगड किल्ला हा महाबळेश्वरला भेट देण्याचा उत्तम काळ आहे ऑक्टोबर ते जून. प्रतापगड किल्ल्याचा प्रवास वर्षाच्या कोणत्याही वेळी करता येतो पण पावसाळ्यात या भागाचे सौंदर्य आणखी वाढले जाते.

प्रतापगड किल्ला चढायला किती वेळ लागतो How long does it take to climb Pratapgad fort?

हा किल्ला महाबळेश्वर पासून 20 किलोमीटर अंतरावर आहे तेथे येण्यास तुम्हाला 40 मिनिटे लागतील या किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला 450 ते 500 पायऱ्या चढणे आवश्यक आहे.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments