पेट्रोल पंपावर पैसे देण्यासाठी ATM कार्ड वापरत आहात मग तुम्हाला ही गोष्ट माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे

आता तुम्ही पाहत असाल की जवळ जवळ सगळेच डिजिटल बँकिंगकडे वळलेले आपल्याला दिसत आहेत.

त्यामुळे आता लोक जास्त प्रमाणात आपल्या जवळ पैसे न ठेवता फोन पे, गुगल पे किंवा कार्डने सर्वत्र पैसे देत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. यातच तुम्ही पेट्रोल पंपावर देखील पैसे देण्यासाठी कार्डचा वापर केला असेल किंवा बरेच लोक हे दररोजच्या वापरात देखील पेट्रोल भरण्यासाठी कार्ड हा सोयीचा पर्याय म्हणुन वापरत असतात. परंतु तुम्हाला माहितीय असं करणं तुम्हाला धोक्याचे ठरू शकतो. आज-काल हॅकर्स ऑनलाइन फसवणुकीचा विविध पद्धती द्वारे लोकांच्या बँक खात्यातून पैसे काढत आहेत. त्यात आता पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येणाऱ्या लोकांना सुद्धा टार्गेट करत आहेत हे लोक ATM कार्ड हॅक करून त्यांचा क्लोन तयार करतात आणि लोकांचे बँक अकाऊंट हॅक करत आहेत.

सोमवारीच यूपी पोलिसांनी अशा एका टोळीचा पडदा फास केलेला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केलेले आहे तर त्याचे तीन साथीदार फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीं पैकी एक पेट्रोल पंपावर काम करणारा कर्मचारी आहे.
या चौकशी दरम्यान असे समोर आले आहे की पेट्रोल पंपावर इंधन टाकणारे लोक जेव्हा इंधनाचे पैसे देण्यासाठी एटीएम कार्ड पुढे करायचे तेव्हा आरोपी त्यांच्याजवळ असलेल्या स्कॅनर मशीन एटीएम कार्ड स्कॅन करायचे आणि एटीएम क्लोनिंग करायचे एवढेच नाही तर हे लोक जेव्हा मशीन मध्ये आपल्या कार्डचा पिन नंबर टाकायचे तेव्हा हे लोक पिन देखील मिळवायचे त्यामुळे त्यांना लोकांचे बँक अकाउंट खाली करण्यास मदत होत असायची.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment