आज आपण पुरणपोळी कशी करायची ते पाहणार आहोत.
महाराष्ट्र मध्ये जास्त प्रमाणात करणारी म्हणजे पुरणपोळी करतात देवाला नैवेद्य म्हणून पुरणपोळी ही केली जाते. पुरणपोळी किंवा पुरणाची पोळी असे बरेच वेगवेगळ्या नावाने ओळखला जाणारा हा खाद्यपदार्थ आहे महाराष्ट्रात महत्त्वाचा पदार्थ सुद्धा आहे.
देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा सणाच्या निमित्ताने दाखवला जातो किंवा होळीच्या दिवशी पुरणपोळी चा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो लोक एकादा सण आले असता पुरणपोळी करत असत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी म्हणजेच गुढीपाडवा मकर संक्रात बैलपोळा होळी श्रावणी शुक्रवार अशा सणांच्या दिवशी पुरणपोळी ही केली जाते दिवाळीच्या लक्ष्मीपूजन आला किंवा नवरात्रीच्या नवमिला सुद्धा पुरणपोळी केली जाते.
- तर आपण आता पुरणपोळी ची कृती पाहणार आहोत
हेही वाचा : इडली कशी बनवायची
- जर तुम्हाला पुरणपोळी करण्यासाठी आवश्यक साहित्य म्हणजे हरभरा डाळ, गुळ, किंवा साखर एखादा छोटा चमचा, वेलची पूड, जायफळ किंवा सुंठ, गहू पीठ किंवा मैदा आणि पाणी असे साहित्य तुम्हाला आवश्यक आहे.
- तर प्रथम हरभरा डाळ कुकरमध्ये चांगली शिजवून घ्यावी ती पंधरा मिनिटे किंवा वीस मिनिटे व्यवस्थित शिजून द्यावे.
- डाळ शिरल्यानंतर त्याच्यातले साधन म्हणजेच उकळलेले पाणी काढून टाकावे काढून टाकलेले पाणी कटाच्या आमटीसाठी वापरले जाते.
- शिजलेल्या डाळीत गूळ घालून मंद आचेवर शिजवून घ्यावी म्हणजे नंतर पर्यंत तयार होईल त्यात तुमच्या आवडीप्रमाणे वेलची पूड जायफळ पदार्थ घालावेत.
- त्यानंतर तयार झालेले पुरण पुरण यंत्रणातून किंवा जुन्या प्रकारे वाटून किंवा गाळून घ्यावे म्हनजे ते एकजीव होईल.
- त्यानंतर गव्हाचे पीठ किंवा मैदा मळून घ्यावा आणि त्याची कनिक तयार करावे म्हणजे पुरणपोळीला पिवळा रंग येण्यासाठी तुम्ही पूरणामध्ये हळद वापरावे.
- त्यानंतर तुम्ही पुराणाचे सारण कणकेचा गोळा तयार करून त्याच्यात भरावे आणि छान पुरण पोळी लाटुन घ्यावे व नंतर तव्यावर मध्यम स्वरूपात तेल लावून पोळी भाजून घ्यावे.