पुणे विद्यापीठाचे यंदाचे सत्र परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने होणार असून त्याचे वेळापत्रक जाहीर होण्यास सुरुवात झालेली आहे. या परीक्षा विद्यापीठाने 15 फेब्रुवारीपासून होणार आहेत असे जाहीर केले आहे. या परीक्षा ऑनलाइन होणार असल्याच्या त्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ( पद्धतीच्या होणार आहेत.
ऑनलाइन परीक्षा होणार असल्याने विद्यापीठ हे यावर्षी चांगलेच कडक निर्बंध ठेवून परीक्षा घेणार आहे. विद्यार्थीही ऑनलाईन परीक्षेचा गैरफायदा घेऊन कॉपी करून पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर सावित्रीबाई फुले विद्यापीठ परीक्षेदरम्यान वॉच ठेवणार आहे.
यावर्षी विद्यापीठातर्फे परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या स्क्रीन चे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग केले जाणार असून यात विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळून आल्यास त्यांच्यावर पुणे विद्यापीठ कडक कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे. विद्यापीठाचे यावर्षीचे सत्र परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने होणार असून त्याचे वेळापत्रक जाहीर होण्यास सुरुवात झालेली आहे. या परीक्षा हया येत्या 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. या परीक्षा ऑनलाइन होणार असल्याने त्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (MCQ) पद्धतीच्या होणार आहेत. या परीक्षांमध्ये गेल्या वर्षी अनेक विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे विद्यापीठाला आढळून आले आहे.
आता यामध्ये विद्यापीठाने आणखी काही कडक नियम लागू करण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या स्क्रीनचे रेकॉर्डिंग केले जाणार आहे. संबंधित विद्यार्थी परीक्षा देताना जर बोलत असतील किंवा ते स्क्रीन सोडून बाहेर जात असतील तर त्यांना परीक्षेतून बाद करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. परीक्षा अधिक पारदर्शी पद्धतीने व्हावेत यासाठी हा प्रयत्न करण्यात येत असल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी स्पष्ट केले आहे.
ऑनलाइन परीक्षांमध्ये याआधी झालेल्या कारवाई Action taken earlier in online exams
1800 विद्यार्थी कॉपी करताना सापडले.
60 टक्के म्हणजेच 1200 पेक्षा अधिक विद्यार्थी इंजिनियरिंगचे होते
600 विद्यार्थी कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन शाखेतील होते
कॉफी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक हजार रुपयांचा दंड
विद्यार्थ्यांनी एकापेक्षा अधिक पेपर मध्ये गैरप्रकार केल्याचे आढळून आल्यास संपूर्ण परीक्षा रद्द होणार आहे.