Pm Kisan new registration पी एम किसान नवीन ऑनलाइन नोंदणी सुरु
पी एम किसान योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे तर तुम्ही लवकरात लवकर नोंदणी करून घ्या तर नोंदणी कशी करायची पाहते संपूर्ण माहिती.
जर तुम्हाला पी एम किसान योजनेचे नोंदणी करावयाची असेल शेतकऱ्यांना तीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
- या योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी शेतकरी आपली कागदपत्र आपल्या गावातील तलाठी कार्यालयात जमा करू शकता त्यासाठी आधार कार्ड खाते उतारा आणि बँक पासबुकची झेरॉक्स आवश्यक आहे.
- कॉमन सर्विस सेंटर ही शेतकरी नावाची नोंदणी करू शकतो मात्र येथे नोंदणी करावयाची असल्यास त्यासाठी ठराविक शुल्क आकारले जात आहे.
- शेतकरी स्वतः पी एम किसान पोर्टल वर जाऊन स्वतः नाव नोंदणी करू शकतात त्याच बरोबर त्यांच्या माहितीमध्ये बदल ही करू शकतात.
पी एम किसान ऑनलाईन नोंदणी कशी करायची. How to rwegistration pm kisan online
- ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सगळ्यात पहिल्यांदा पी एम किसान PM Kisan गुगलवर सर्च करावे लागेल.
- त्यानंतर पी एम किसान सन्मान निधी PM Kisan ची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन झालेली असेल.
- त्यानंतर तुम्हाला उजवीकडे फार्मर कॉर्नर हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर 10 पर्याय तुमच्या समोर येतील त्यातील पहिला पर्याय आहे नवीन शेतकरी नोंदणी या पर्यायावर क्लिक केलं की new farmer registration या नावाचं एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन झालेले दिसेल.
- या ठिकाणी तुम्हाला आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे.
- मोबाईल नंबर वरती एक ओटिपी पाठविला जाईल.
- त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती आलेला ओटीपी टाकून द्यायचा आहे.
- त्यानंतर पुढे एक कॅपच्या कोड तसा टाकून घ्यायचा आहे तुम्ही रोबोट किंवा यंत्र नाही तर माणूस आहात हे तुम्हाला तुम्ही ज्या मशीन वर फॉर्म भरता त्या मशीनला पटवून द्यायचं असतं त्यासाठी कॅपच्या मधील आकडेवारी किंवा अक्षरे जशीच्या तशी समोरच्या कारखान्यात भरावयाची आहेत.
- आलेला कॅपच्या टाकल्यानंतर पुढे सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल त्या मध्ये सुरुवातीला शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती भरायची आहे.
- यामध्ये सुरुवातीला तुमचे राज्य निवडायचे आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि त्यानंतर तुमचा तालुका निवडल्यानंतर मग तूमचे गावाचे नाव सिलेक्ट करायचे आहे.
- त्यानंतर तिथे खाली शेतकऱ्याचे नाव टाकायचे आहे इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे ती म्हणजे आधार कार्डवर तुमच्या नावाची स्पेलिंग जशी लिहिलेले आहेत तसेच स्पेलिंग येथे नाव टाकतांना लिहायचे आहे एक जरी इंग्रजी शब्द इकडे-तिकडे झाला तर तुमचा फॉर्म पूर्ण होऊ शकत नाही.
- पुढे तुमचे लिंग निवडायचे आहे.(मेल, फिमेल की अदर्स) आणि मग तुम्ही कोणत्या प्रवर्गात मोडतात (जनरल, एससी, एसटी की इतर) ते तिथे निवडायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला तिथे फार्मर टाईप मध्ये शेतकऱ्याचा प्रकार निवडायचा आहे म्हणजे जर तुमच्याकडे 1 ते 2 हेक्टर दरम्यान शेती असेल तर तुम्हाला पहिल्या पर्यायावर क्लिक करायचे आहे आणि जास्त असेल तर अदर या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- आपण नोंदणीसाठी आधार क्रमांक दिलेला असल्यामुळे एक आयडेंटी प्रूफ नंबर आपोआप जनरेट होत असतो.
- आता पुढे तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे तुमचे बँक खात्याची माहिती भरायची आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या बँकेचा आय एफ एस सी कोड टाकायचा आहे हा कोड तुमच्या बँक पासबुक वर दिलेला असतो त्यानंतर बँकेचे नाव टाकायचे आहे व मग खाते क्रमांक टाकायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला पत्ता टाकायचा आहे.
- पुढे जमिनीचा खाते क्रमांक आणि रेशन कार्ड टाकून झाला की तुम्हाला submit for Aadhar authentication या पर्यायावर क्लिक करायचा आहे आणि या पर्यायावर क्लिक केल्यानंतर yes Aadhar Authenticated successfully असा एक लाल अक्षरात मेसेज तिथे येतो याचा अर्थ तुमचं आधार प्रमाणीकरण यशस्वीरीत्या झालेले आहे.
- त्यानंतर तुम्हाला पुढे जमिनीच्या मालकीचा प्रकार सांगायचा आहे यात स्वतः च्या मालकीची जमीन असेल तर सिंगल या पर्यायावर क्लिक करायचा आहे आणि सामुहिक मालकीची शेतजमीन असेल तर जॉईंट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर Add पर्यायावर क्लिक करून शेत जमिनीची माहिती भरायची आहे आता येथे तुम्हाला सर्वे नंबर किंवा खाते नंबर मध्ये सातबारावरील जो खाते क्रमांक आहे तो टाकायचा आहे त्यानंतर खासरा किंवा डॅगमध्ये सातबारावरील गट क्रमांक टाकायचा आहे आणि सगळ्यात शेवटी तुमच्याकडे किती जमीन आहे ते हेक्टर मध्ये लिहायचं आहे सातबार्यावर जितकी जमीन नोंदवलेले आहेत तो आकडा येथे टाकायचा आहे.टाकल्यानंतर पुढे Add बटन दाबलं की तुमच्या माहितीची तिथे नोंद केली जाते.
- त्यानंतर पुढे तुम्हाला तुमच्या जमिनीचा खाते उतारा आधार कार्ड आणि बॅंक पासबुक ही कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
- ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर पुढे तुम्हाला I certify that all the given details are correct म्हणजे मी दिलेली सगळी माहिती खरी आहे या पर्याय समोरच्या चौकोनात टिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्ही self declaration form वर क्लिक करून तिथे दिलेली माहीती वाचु शकता आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सरकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी करदाते नाही याबद्दल माहिती त्यात दिलेली असते.
- सगळ्यात शेवटी तुम्हाला सेव या बटणावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला स्क्रीन वर एक मेसेज येईल त्यावर लिहिलेलं नसेल की**** हा तुमचा identity proof number आहे आणि तुम्ही यशस्वीरित्या नोंदणी केलेली आहे पुढील मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवली जाईल ही माहिती समाधानकारक असेल तर योजनेसाठी तुमचा विचार केला जाईल अन्यथा अर्ज नाकारला जाईल.
पी एम किसान स्टेटस How to check pm kisan beneficiary status
एकदा फॉर्म भरून झाला की काही दिवसांच्या अंतराने तुम्ही तुमच्या फॉर्म चे टेटस पाहू शकता त्यासाठी फार्मर कॉर्नर मधील status of self registered or CSC farmer या पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक आणि कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्म चे स्टेटस तिथे पाहायला मिळेल.