पित्ताचा त्रास का होतो
- चमचमीत मसालेदार आहार आरोग्य जीवनशैली मानसिक ताण अपुरी झोप यामुळे आज अनेक आरोग्याच्या तक्रारी बरोबरच पित्ताचा त्रासही जास्त प्रमाणात होत आहे.
- पित्तामुळे ऍसिडिटी डोकेदुखी अंगावर पित्ताच्या गांधी उठणे (शीतपित्त) अशा अनेक तक्रारी होत असतात.
- यासाठी पित्त वाढण्याची कारणे आणि पित्त कमी करण्याचे उपाय खाली दिले आहेत.
पित्त वाढण्याची कारणे
- पित्त कशामुळे वाढते काय खाल्ल्याने पित्त वाढते.
- वारंवार तिखट मसालेदार आंबट खारट पदार्थ खाण्यामुळे मासांहार लोणची पापड आंबवलेले पदार्थ म्हणजेच आंबट दही ताक इडली डोसा ब्रेड यांसारखे पदार्थ अधिक खाण्यामुळे तसेच
- वारंवार चहा-कॉफी कोल्ड्रिंक्स पिण्यामुळे
- उपवास करणे जेवणाच्या वेळा न पाळणे बराच वेळा उपाशी राहण्याच्या सवयीमुळे
- तंबाखू सिगारेट गुटखा मद्यपान सारख्या व्यसनांमुळे
- मानसिक तणाव राग यामुळे
- वरचे वर डोके दुखी अंग दुखी च्या गोळ्या घेत राहिल्यामुळे
- जागरण करणे यामुळे पित्ताचा त्रास प्रामुख्याने होत असतो.
पित्त कमी करण्यासाठी काय करावे
- लाईफ स्टाईल मध्ये बदल करावा.
- चुकीचा आहार आरोग्य जीवनशैली यामुळे पित्ताचा त्रास होत असतो त्यासाठी हेल्दी लाइफस्टाइल म्हणजे योग्य आहार घेणे नियमित व्यायाम करणे पुरेशी झोप घेणे तणावापासून आणि व्यसनांपासून दूर राहिल्यास तर कमी होईलच शिवाय आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.
हिरव्या पालेभाज्या खाव्यात
- हिरव्या पालेभाज्या फळभाज्या आहारात असाव्यात विविध फळे खावीत यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स व्हिटॅमिन्स असतात फायबरमुळे नियमित पोट साफ होऊन पित्त कमी होते आहारात आले वेलदोडे मिरी मनुका केळी कारले आवळा यांचा प्रामुख्याने समावेश करावा.