पंचमुखी हनुमानाची माहिती
महीरावणाचा वध करायला हनुमान पातळ लोकांत गेल्यावर तिथल्या पाच दिव्यांचा एकाच वेळी विनाश करून ते विझल्याशीवाय महिरावण मरणार नाही हे हनुमानाला माहित होतं. त्यामुळे त्यांनी पंचमुखी रूप धारण करून तिथल्या पाच दिव्यांचा एकाच वेळी विनाश केला. पाच वेगवेगळ्या शक्ती एकत्र करून एकच रूप धारण केलेल्या हनुमानाने दक्षिणेच्या महीरावणाचा विनाश केला.
- म्हणून दक्षिणेकडे तोंड करून पंचमुखी हनुमानाचा फोटो लावण्याची प्रथा प्रचलित आहे.
- पूजा घरात पंचमुखी हनुमान असला तरी घराच्या दक्षिणेस एक ॲडिशनल एकमुखी हनुमान लावतात तो त्यामुळेच.
- दक्षिण ही यमाची दिशा शिवाय दक्षिण म्हणजे पातळ म्हणून हे खास खबरदारी.
पंचमुखी हनुमानाची पाच मुख
- सात्विकता, पवित्रता, यश, भक्ती, औदार्य, त्याग आणि बलाचा संदेश देणार मुख्य हनुमान मुख.
- निर्भयपणा आणि संकटाशी सामना करण्याचा संदेश देणार प्रबळ शक्ती देणारं नरसिंह मुख.
- जादूटोणा, मंत्र-तंत्र व विविध बांधापासून हरण करणार आणि त्यापासून सतत रक्षण करून आवरण कवच निर्माण करणार गरुड मुख.
- सर्व क्षेत्रात प्रगती, संपत्ती, यश, धन, समृद्धी ऐषाराम देणार वराह मुख.
- अवकाशापासून येणाऱ्या सर्व दृष्ट शक्तींना रोखून चांगल्या शक्तींना थारा देणारे हयग्रिवाचं मुख.