धने माहिती मराठी Coriander information in marathi
- मसाल्याच्या पदार्थातील महत्त्वाचा घटक म्हणजे धने स्वयंपाक घरात धन्याला विशेष महत्त्व आहे रोजच्या स्वयंपाकात धने आवर्जून वापरले जातात.
- आमटी मसालेदार भाजी याची चव येण्यासाठी धने पूड टाकली जाते भारतात अनेक ठिकाणी धने शुभ मानले जाते औषधे पूजेसाठी सुद्धा साधने वापरतात.
मात्र आपण या शुभ धण्याचे आयुर्वेदात काय स्थान आहे ते आता पाहूया
धने पित्ताचे विकार असणाऱ्यांसाठी वरदान आहे धने उष्ण गुणाचे असून पाचक अन्नाची रुची वाढवणारे युरीन साफ करणारे आम्लपित्त शरीरातील पित्त वाढल्यामुळे येणारा ताप जुलाब शरीरातील काही विशिष्ट जंत यांवर उपयोगी आहे.
अर्धा चमचा भरुन धने एक कप दूध व अर्धा चमचा साखर उकळून सकाळी प्यायल्याने शरीरातील उष्णता गर्मी कमी होते व पचनक्रिया सुधारते. तुम्हाला जर वारंवार तहान लागत असेल तर धण्याचा खूप छान फायदा होतो रात्री एक पिला पाण्यात दोन चमचे धने भिजवून सकाळी कुस्करून ते पाणी गाळून घ्यावे व या पाण्यात खडीसाखर व मध मिसळून थोड्या थोड्या वेळाने पीत राहावे.
धने मराठी माहिती Coriander information in marathi
तापात रुग्णांच्या शरीरातील उष्णता वाढते वारंवार तहान लागते अशावेळी धने साखर व काळे मनुके पाण्यात भिजवून मग सात ते आठ तासांनी कुस्करून गाळून हे पाणी घोट घोट घेत राहावे.
ज्यांना युरीनचा त्रास होत असेल अडथळे येत असेल साफ होत नसेल तर रोज सकाळी धन्याचा काढा घ्यावा. धने व गोखरू एकत्र उकळून मग गायीचे तूप घालून घ्यावे त्याने युरिनरी ट्रॅक चे त्रास दूर होतात.