देशातील पहिला विहीर जोड प्रकल्प या विषयी आज आपण माहिती पाहणार आहोत.
सातारा जिल्ह्यातील धावडशी गावात काही जास्त पाणी असते तर काहींना कमी पाणी असते. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. त्यानुसार गावच्या ओढ्या जवळील एक बोरवेल व दोन विहिरींतील पाणी लिफ्ट करून दुसऱ्या विहिरीत व तेथून पुन्हा पाणी लिफ्ट करीत अकरा हजार फूट पाइपलाइन डोंगराच्या पायथ्यापर्यंत नेण्यात आली.
या रीतीने गावातील तेरा विहिरी तीन बोरवेल व दोन शेततळी एकमेकांना जोडण्यात आली आहेत यामुळे सुमारे 150 एकर जमीन ओलिताखाली आले आहे.