मनुष्य शरीर स्थित कुंडलिनी शक्ती मध्ये जे चक्र आहेत ते सात चक्र आहेत. दहीहंडीत रचले जाणारे थर सुद्धा सात असतात ( किंवा सातच असावेत ). ( हल्ली आठ थरांच्या, नऊ थरांच्या ज्या हंड्या रचल्या जातात. त्या विक्रम नोंदवण्यासाठी रचल्या जातात.)
हे सात कुंडलिनीशी संबंधित आहेत. तेच थर
- मुलधार चक्र
- स्वाधिष्ठान चक्र
- मणिपूर चक्र
- अनाहत चक्र
- विशुद्ध चक्र
- आज्ञा चक्र
- सहस्तर चक्र असे आहेत.
मनुष्याने कुंडलीनीचे हे सात थर जागृत करून अर्थात दहीहंडीत रचलेले सात थर वर चढून जाऊन परमहंस पदाची प्राप्ती अर्थात मोक्षाची प्राप्ती अर्थातच हंडी फोडून हंडीतले जे माखन- लोणी आहे ते प्राप्त करायचे असते.
एक प्रकारे विचार केला तर दहीहंडी ही योग क्रिया आहे.
दहीहंडीत सुद्धा पहिल्या थरापासुन सातव्या थरापर्यंत जाऊन मग माखन – लोणी मिळवायचे असते. हे सात थर जो पर्यंत मजबूत आणि स्थिर अवस्थेत राहत नाही तोपर्यंत शेवटी जाऊन हंडी फोडता येत नाही. मूलाधार चक्रापासून सुरुवात करून सहस्रर चक्रापर्यंत जायचे असते. सप्तस्तर जागृत करणे म्हणजे अनेक महत्त्वाच्या विद्युतीय आणि जैविक विद्युत शक्तीचा संग्रह आहे. आणि दहीहंडी आपल्याला हीच शिकवण देते दहीहंडीला आताच्या काळात जरी उत्सवाचे स्वरूप आले असले तरी हे मूळ हेतू विसरता कामा नये.
सुनील इनामदार