आज दुपारी एक वाजल्यापासून दहावीचे विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी थांबलेले होते. परंतु अचानक साईट क्रॅश झाल्याने पालक व विद्यार्थी निराश झाले.
कोरोनाच्या काळामुळे यावर्षी दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. मात्र त्यांच्या मूल्यमापनाच्या आधारे आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. दहावीचा निकाल हा 99.95% लागला असल्याची माहिती शिक्षण मंडळाने व पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद झाल्यानंतर दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार होता. मात्र निकाल पाहण्याचा वेबसाईट ह्या अचानक क्रॅश झाल्या. त्यामुळे निकाल पाहण्यास अडचण आलेले आहे.
कोरोनाच्या काळात नेटवर्क मुळे युजर्स फार वाढलेले आहे. त्यामुळे निकाल पाण्याच्या साईटला भेट देण्याची संख्याही जास्त झालेले आहे. त्यामुळे व अशा कारणामुळे निकालाची वेबसाईट क्रॅश झालेली आहे. संख्या जास्त असल्यामुळे वेबसाईट क्रॅश झालेल्या आहेत.
दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटचा वापर करून पाहू शकता पण वेबसाईटवर निकाल केंव्हा दिसेल हे सांगता येत नाही.
- mahresult.nic.in
- mahahsscboard.in
- results.gov.in.
येथे पण निकाल पाहू शकता.