Happy Dussehra : दसरा म्हणजेच विजयादशमी या सणा दिवशी सर्व माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न आम्ही या लेखामध्ये केलेला आहे
दसरा सणाची माहिती मराठी Dussehra festival information in marathi
विजयादशमी म्हणजेच अश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो याच दिवसाला दसरा असे म्हटले जाते देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते.
सोने घ्या आणि सोन्यासारखे राहा असं म्हणत आपट्याचे पाने वाहून एकमेकांना शुभेच्छा देऊन आपण जो सण साजरा करतो तो म्हणजे दसरा सगळ्यात मोठा आणि पवित्र सण म्हणून साजरा केला जातो. ह्या सणाबद्दल आज थोडी आपण जास्त माहिती घेऊ
दसरा सणाची माहिती मराठी Dussehra festival information in marathi
दसरा हा सण हिंदू धर्मामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो त्या दिवशी एकमेकांना शुभकामना दिल्या जातात नवीन कपडे या सणानिमित्त खरेदी केले जातात तसेच सोने-चांदी देखील या सणानिमित्त खरेदी केले जाते घराला आंब्याच्या पानांची व झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जाते दसऱ्याला झेंडूच्या फुलांची पूजा करण्याची प्रथा आहे यंत्र वाहणे यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात.
दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा असे म्हणण्याची परंपरा सुरू झाली ती उगाच नाही तर विजय प्राप्त करणारा फार मोठा इतिहास या दिवसाच्या मागे दडलेला आहे.
पराक्रमाचा आणि पुरुषाचा असा हा सण या दिवशी चातुर्वर्ण सोबत आलेले दिसतात
प्रभू रामचंद्रांनी रावणासारख्या बलाढ्य युद्धाचा वध करून शत्रूवर विजय प्राप्त केला तो याच दिवशी
देवी दुर्गेने महिषासुर राक्षसाला युद्ध करून संपविले ते पाच दिवशी आणि त्यामुळेच तिला महिषासुरमर्दिनी असे म्हटले जाऊ लागले
या आख्यायिकांचा इतिहास पाठीमागे असल्याने बरेच राजपूत आणि मराठा युद्ध आपल्या युद्ध मोहिमांचा आजच्या दिवशी शुभारंभ करीत असत.
दसरा सणाची संपूर्ण माहिती / Dussehra information in Marathi
विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीची पूजा या दसऱ्याच्या दिवशी केली जाते या दसऱ्याच्या दिवशी अपराजित देवीची पूजा केली जाते या दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची एक प्रचलित प्रथा आहे लोक या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाने देतात सायंकाळी गावाची सीमा ओलांडून जायचे शमीचा किंवा आपट्याचा झाडाची पूजा करायची ते अष्टदल काढून त्यावर अपराजितेची देवीची स्थापना करावयाची आणि तिला प्रार्थना करावयाची की मला विजयी कर
दसरा का साजरा करतात / Why celebrate Dussehra
या दसऱ्याच्या दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला होता व तेव्हापासून हा दिवस विजयोत्सव साजरा करण्यासाठी म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून म्हणजेच दसरा म्हणून साजरा केला जातो विजयाची प्रेरणा देणारा आणि छत्रवृत्ती जागृत करणारा हा दुसरा सण आहे.
नवरात्राची प्रथा आणि परंपरा / Navratri Puja vidhi
नवरात्र सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यात येत असते तेव्हा भाविक आपल्या आपापल्या कुळाप्रमाणे नवरात्रोत्सवाचे स्थापना करतात. घरी आणि मंदिरात किंवा आपल्या गावातील मंडळ हे दुर्गेच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करतात व देवीला नैवेद्यात फळ आणि फुल वाहिले जातात लोक एकत्र येऊन आरती, गायन आणि भजन देखील म्हणतात या नवरात्रीच्या उत्सवात प्रत्येक दिवशी या घटावर फुलांची माळ सोडली जाते. प्रत्येक दिवशी अनेक ठिकाणी वेड्यांच्या पानांची माळ लावण्याची देखील एक परंपरा आहे. पूजेत पाच प्रकारची फळे ठेवण्यात येतात आणि वर फुलोरा बांधला जातो. गणपतीची, देवीची आणि नवरात्रीची आरती म्हटली जाते सकाळ-संध्याकाळ आरती आणि धूप पेटवला जातो
दसरा साजरा करण्यामागील शास्त्र व इतिहास /
The science and history behind celebrating Dussehra
दसरा हा प्रारंभी एक कृषीविषयक लोकोत्सव होता पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावेळी शेतकरी हा उत्सव साजरा करत नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखालच्या स्थंडिलावर नऊ धान्यांची पेरणी करतात व दसर्याच्या दिवशी त्या धान्यांचे वाढलेले अंकुर उपटून देवाला वाहतात कित्येक ठिकाणी शेतातल्या भाताच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधतात ही प्रथादेखील या सणाचे कृषीविषयक स्वरूपच व्यक्त करते पुढे याच सणाला धार्मिक स्वरूप दिले गेले आणि इतिहासकाळात तो एक राजकीय स्वरूपाचा सण ठरलेला आहे.
नवरात्राची कथा / Navratri story in Marathi
रामायणानुसार प्रभू रामचंद्रांनी देवी दुर्गेला रावणासोबत युद्ध होत असताना बोलावले होते वसंत ऋतूच्या शेवटी दुर्गादेवीची पूजा-अर्चना केली जाते. युद्धाची शक्यता पाहता प्रभू रामचंद्रांनी देवीला असत महाविद्यालय बोलावले होते ज्याला आपण अकाल बोधन या नावाने देखील जाणतो. पण हि पुजा पारंपारिक दुर्गा पूजे पेक्षा थोडी वेगळी असते. या पूजेला अकाल बोधन असे म्हणतो. तिला आपण कधीही करता येणार नाही अशी पूजा देखील म्हणतो.
दसरा हा कोण कोणत्या प्रांतात साजरा केला जातो / Dussehra is celebrated in which state
दसरा हा उत्तर भारत गुजरात छत्तीसगड महाराष्ट्र पंजाब दक्षिण भारत आंध्रप्रदेश येथील विजयवाडा अशा या अनेक ठिकाणी हा दसरा सण अनेक प्रकारच्या माध्यमातून साजरा केला जातो. भारतात सर्वत्र हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो उत्तर भारतात या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करतात. कुलू खोऱ्यातील लोक आपल्या रघुनात या देवतेचा उत्सव दुसऱ्याच्या दिवशी साजरा करतात रघुनाथाची रथयात्रा नृत्य बलिदान इत्यादी विधी करतात महाराष्ट्रात या दिवशी सीमोल्लंघन करुन आपट्याची पूजा करतात व त्याचे पाने सोने म्हणून परस्परांना देतात.
अशाप्रकारे दसरा सणाची माहिती मराठी (Dussehra festival information in marathi) हा सण भारतात विविध ठिकाणी मिठाई वाटून व एकमेकांना शुभेच्छा देऊन मोठ्या आनंद व उत्साहाने साजरा केलेला आपल्याला दिसून येत आहे.
लक्ष द्या : तुमच्याजवळ आणखी नवरात्री बद्दल माहिती असेल तर कमेंट मध्ये जरूर टाका आवडल्यास आम्ही ती माहिती या लेखात अपडेट करू