How To Create UPI Pin : तुम्ही जर आजच्या काळात अजूनही मोबाईल वरून ऑनलाइन पमेंट करत नसाल तर तुम्हीअजूनही मागे आहात असे अनेकांचा समज होऊ शकतो. त्यामुळे मोबाईल वरून ऑनलाईन पेमेंट कसे करतात त्यासाठी सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा युपीआय पिन/UPI PIN कसा बदलतात हे जाणून घ्या.
तुम्ही आज पाहतच असाल की तुम्ही कुठेही व कोणत्याही दुकानात भाजीपाला खरेदी करायला किंवा शॉपिंग मॉलमध्ये खरेदी केल्यानंतर नंतर पेमेंट करण्याच्या वेळेस बरेच जण हे डिजिटल पेमेंट करण्याच्या पद्धतीला अनेकांची पसंती बनलेली आहे. गुगल पे पासून फोन पे पर्यंत अनेक यूपीआय ऑनलाइन पेमेंट करण्याची सुविधा देत असतात. यू पी आय पिन पेमेंट करण्यासाठी असणे अत्यंत गरजेचे असते. याशिवाय तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकत नाही. जर तुम्ही आतापर्यंत यूपीआय पीन बनवला नसेल तर हि सोपी पद्धत जाणून घ्या आणि तुमचा UPI PIN बनवण्यासाठी तुमच्याकडे डेबिट कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे.
यु पी आय पिन तयार कसा करायचा? How To Create UPI Pin
तुम्ही खाली दिलेल्या पद्धतीने गुगल पे चा UPI PIN बदलण्यासाठी तुम्हाला
- सगळ्यात पहिल्यांदा ॲप सुरू करावं लागेल.
- त्यानंतर उजव्या बाजूला वरती आपल्या फोटो वरती क्लिक करा.
- त्या ठिकाणी तुम्हाला तिथे तुमचे बॅक अकाऊंट/Bank Account चे पर्याय दिसतील त्यावरती क्लिक करा.
- तुम्हाला ज्या बँक अकाउंट पिन बदलायचा आहे त्या बँक अकाउंटवर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला पुढे एक Forgot Pin असा एक पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा.
- तुम्हाला पुढे डेबिट कार्डच्या एक्सपायरी डेट/Expiry Date सह शेवटचे 06 अंक भरावे लागतील. नंतर तुम्हाला नवा यूपीआय पिन/UPI PIN क्रियेट करता येईल.
- यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक ओटीपी/OTP येईल.
- ओटीपी/OTP टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा नवीन UPI PIN जनरेट करता येईल.