भारतासह अनेक देशांमध्ये क्रिप्टो करन्सी अचानक लोकप्रिय झाले आहे बिटकॉइन सारखे क्रिप्टो करन्सी मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत पण जर तुम्ही सुद्धा त्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर नक्की थांबा.
अलीकडेच गुगलने त्याच्या प्ले स्टोअरवरून अशा 8 ॲप्सवर बंदी घातली ची क्रिप्टोकरन्सी च्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहे. जर तुम्ही चुकून हे ॲप्स डाऊनलोड केले असतील तर उशिर न करता ते लगेच डिलीट करा. अन्यथा तुमच्या फोनवर मालवेअर हल्ला होऊ शकतात त्या नंतर तुमचे बँक खाते रिकामे होईल.
अशाप्रकारे खाते रिकामी होईल :
सिक्युरिटी फर्म ट्रेंड मायक्रोच्या अहवालानुसार तपासात असे आढळून आले की 8 धोकादायक ॲप्स जाहिराती दाखवून आणि सबस्क्रीप्शन सेवा ( महिन्याला सरासरी 1100रुपये ) आणि अतिरिक्त शुल्क आकारून वापरकर्त्यांची फसवणूक करत आहेत. एकदा पैसे भरल्यानंतर वापरकर्त्याचे यांचे खाते हॅक केले गेले आणि नंतर त्याचे खाते रिकामे करायचे.
ट्रेंड मायक्रोने गुगल प्लेला याबद्दल माहिती दिली, त्यानंतर ती ॲप्स प्ले स्टोअर मधून काढून टाकले गेले. तथापी प्ले स्टोअर मधून काढून टाकल्यानंतरही हे ॲप सध्या आपल्या फोनमध्ये कार्य करत असतील तर आता तुमचा फोन तपासा आणि ते ॲप्स ताबडतोब डिलीट करा.
हे आहेत ते खालील ॲप्स :
- बिट फंडस्
- बिटकॉइन माइनर
- बिटकॉइन
- क्रिप्टो होलीक
- डेली बिटकॉइन रिवार्ड
- बिटकॉइन 5021
- माइनबिट प्रो
- इथेरियम
इतर 120 ॲप्सवर गुगलची नजर
अहवालात म्हटले आहे की 120 पेक्षा जास्त बनावट क्रिप्टोकरन्सी ॲप्स अजूनही ऑनलाइन उपलब्ध आहेत. कंपनीने एका ब्लॉगमध्ये लिहिले, हे ॲप्स क्रिप्टोकरन्सी मायनिंग च्या नावाखाली लोकांना फसवण्यासाठी इन ॲप्स जाहिराती दाखवतात.
या ॲप्सने जुलै 2020 ते जुलै 2021 पर्यंत जगभरातील 4500 अधिक वापरकर्त्यांना टार्गेट केले आहे असे कोणतेही एप्स डाउनलोड करण्यापूर्वी कृपया त्याची रिव्हू वाचा यापूर्वीही गुगलने रशियन सिक्युरिटी फर्मच्या तक्रारीवरून आपल्या प्लॅटफॉर्मवरून 9 पेक्षा जास्त ॲप्स काढून टाकली होती ती ॲप्स वापरकर्त्यांची फेसबुक खाते हॅक करत होती.