Extra Income in Home: आजच्या काळात पैसा हा अत्यंत महत्त्वाचा झालेला आहे. तसे पाहण्यास गेले तर पैशाशिवाय कोणते गोष्ट मिळत नाही पण जर तुमच्या पगारापेक्षाही तुमचा जर जास्त खर्च असेल आणि तुम्हाला आणखी पैशाची गरज भासू लागलेली असेल तर तुम्ही हे खाली दिलेली पर्याय नक्की वापरू शकतात.
Part Time Job : तुम्ही मोकळ्या वेळामध्ये घरबसल्या या पाच पद्धतीने पैसे कमवू शकतात. जर तुम्ही या पाच आयडियांपैकी एखादी गोष्ट फॉलो केली तर तुम्ही नक्की घरी बसून जादा कमाई करू शकतात.
ड्रॉप शिपिंग Drop shipping
ड्रॉप शिपिंग व्यवसाय चालू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही अनुभवाची गरज नाही. प्रोडक्ट किंवा सेवा आपल्या स्टोर हाऊस मध्ये न ठेवता ग्राहकाकडून आलेली ऑर्डर ही आपल्या सप्लायर्स कडे दिली जात असते आणि सप्लायर्स पुढे पॅकिंग Packing आणि शिपिंग तसेच डिलिव्हरीची जबाबदारी घेऊन ग्राहकांना ऑर्डरनुसार प्रॉडक्ट्स हे पुरवले जात असतात यालाच ड्रॉप शिपिंग असे म्हणतात.
खाजगी क्लास Private class
तुम्ही एखाद्या विषयात निपुण असाल तर तुम्ही त्या विषयाचे ट्युशन घेत घरबसल्या सुद्धा कमाई करू शकतात. तुम्ही यामध्ये विविध प्रकारच्या विषयांची ट्युशन घेऊ शकतात. तसेच इंग्लिश स्पीकिंग क्लास English Speaking Course किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सारखा कोर्स तुम्ही शिकवू शकतात. यातून तुम्हाला भरघोस उत्पन्न मिळू शकते.
एफिलिएट मार्केटिंग Affiliate Marketing
जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे ऑनलाइन प्रॉडक्ट तुमच्या वेबसाईट किंवा सोशल मीडियाच्या Social Media साह्याने ऑनलाईन विकत असतात तेव्हा त्या प्रोडक्टच्या विक्रीमधून जे काही टक्के कमिशन मिळत असते त्याला एफिलिएट मार्केटिंग असे म्हणतात. यात तुम्हाला घरबसल्या काम करून बराच नफा तुम्ही याच्या मदतीने कमवू शकतात.
कला कौशल्य Art skills
प्रत्येकांमध्ये काही ना काही एक चांगल्या प्रकारचे कला किंवा कौशल्य हे असतातच. मग याच्या मदतीने तुम्ही सुद्धा जादा कमाई करू शकतात. मग यामध्ये तुम्ही डान्स शिकवणे असेल किंवा चित्रकला, मेहंदी, रांगोळी इत्यादी प्रकारचे क्लासेस घेऊन तुम्ही सुद्धा कमाई करू शकतात. तसेच यामुळे तुमच्या कलागुणांना वाव मिळेल आणि आयडियाचे काम करत असल्याचा समाधानही तुम्हाला मिळेल.
डेटा एन्ट्री Data entry
डेटा एन्ट्री खूप प्रकारचे असतात या माध्यमातून तुम्ही खूप चांगली कमाई करू शकतात तसेच अनेक वेबसाईटवर बसलेले त्यांचे काम देत असतात पर्याय तुमच्यासाठी चांगला करू शकतो पण आजच्या काळ डेटा एन्ट्री मध्ये खूप फसवणूक चाललेले आहे त्यामुळे डेटा एन्ट्री करताना काही विचारात घेऊन केले पाहिजे.
युट्युब YouTube
आज प्रत्येक जण हा युट्युब वर व्हायरल होण्यासाठी झटत आहे. कारण Youtube च्या माध्यमातून सुद्धा आपण वेगवेगळ्या विषयांची माहिती देऊन त्यामधून सुद्धा चांगल्या मोठ्या प्रमाणात आपण कमाई करू शकतो.