डिमॅट अकाउंट विषयी माहिती मराठी Complete information about demat account in Marathi

आपणा सर्वांना माहितच आहे की शेअर मार्केटमध्ये Share Market पाऊल ठेवण्याआधी सर्वात पहिली गरज लागते ते म्हणजे डिमॅट अकाउंट बऱ्याच जणांना डिमॅट अकाउंट म्हणजे काय याविषयी माहिती नसते ऐकण्यात खूप वेळ आले असेल पण याविषयी माहिती नसते आपण आज याच डिमॅट अकाउंट विषयी माहिती पाहणार आहोत.

डिमॅट म्हणजे काय What is demat account?

सुरुवातीच्या काळामध्ये एखाद्या कंपनीचे शेअर खरेदी करायचे असते त्यावेळेस तुम्हाला ब्रोकर कडे किंवा स्वत NSE  (National Stock Exchange) किंवा BSE (Bombay Stock Exchange) मध्ये जाऊन तुमच्याकडे ते शेअर आहे त्याला पैसे देऊन त्याबद्दल तुम्हाला शेअर मिळायचे म्हणजे त्याचे लेखी दस्ताऐवज तुमच्याकडे मिळायचे पण आजच्या काळात कशाप्रकारे काहीच राहिलेले नाही. यामध्ये तुम्हाला खूप मोठी प्रोसेस जुन्या काळामध्ये होते. परंतु आता यामध्ये कॉम्प्युटरचा वापर हा वाढत गेल्यानंतर शेअर इलेक्ट्रॉनिक्स फॉर्ममध्ये बदलण्यात आलेले आहेत म्हणजेच डी मटेरियलाईज करण्यात आलेले आहेत आणि ऑनलाईन खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यासाठी ते शेअर साठवण्यासाठी ज्या अकाउंट ची गरज पडते त्याला डिमॅट अकाउंट म्हटले जाते. Demat Account डिमॅट अकाउंट मध्ये फक्त तुम्ही खरेदी केलेले शेअर असतात जे तुम्ही खरेदी केल्यानंतर दोन दिवसानंतर जमा होत असतात. आता तुम्हाला दुसरा प्रश्न पडला असेल की डिमॅट मध्ये जर फक्त शेअरच असतात तर खरेदी करण्यासाठी पैसे कुठून येतात तर याचे उत्तर आहे ट्रेडिंग अकाउंट..

ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय What is a Trading Account?

बरेचसे ट्रेडर्स गैरसमजूतीत असतात की ते ट्रेडिंग अकाउंटला डिमॅट अकाउंट समजत असतात. डिमॅट मध्ये तुमचे शेअर असतात तर ट्रेडिंग अकाउंट मध्ये तुमचे पैसे असतात तुम्ही फक्त ट्रेडिंग अकाउंट सुद्धा काढू शकतात आणि तुम्ही फक्त इंट्राडे व्यवहार यामध्ये करू शकतात. तुम्ही शेअर राखून ठेवू शकत नाहीत. ट्रेडीग अकाउंट तुम्हाला ब्रोकर कडून सुद्धा दिले जात असते. तसेच डिमॅट अकाउंट तुम्हाला फक्त दोनच ठिकाणी मिळू शकते CDSL (Central Securities Depository Limited) व NSDL (National Securities Depository Limited)यांच्याकडून तुम्हाला डिमॅट अकाउंट दिले जात असते. खूप सारे ब्रोकर डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट हे दोन्ही सोबतच तयार करून देत असतात त्यामुळे तुम्हाला हा फरक जाणून येत नाही आणि तसा तो जास्त गरजेचा नाही तसेच या सर्वांवरती सेबीचे (SEBI) चे नियंत्रण असते.
त्यानंतर ट्रेडिंग अकाउंटला तुमचे बँक अकाउंट जोडलेले असते आणि डिमॅट अकाउंट सुद्धा जोडलेले असते. एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करण्यासाठी तुम्ही बँक अकाउंट मधील पैसे ट्रेडिंग अकाउंट मध्ये जमा करता. जेव्हा तुम्ही शेअर खरेदी करतात तेव्हा ट्रेडिंग अकाउंट मधील पैसे ज्याच्या कुणाकडे शेअर विक्रीसाठी आहे त्याच्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये जातात आणि त्याच्या डिमॅट मधील शेअर तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये येतात आणि जेव्हा तुम्ही डिमॅट अकाउंट मधील शेअर विकतात तेव्हा तुमच्या डिमॅट मधील शेअर कमी होऊन पैसे ट्रेडिंग अकाउंट मध्ये जमा होतात ही एकूण अशी प्रक्रिया असते.
तुम्हाला एकदम फ्री मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी येथील लिंक वर क्लिक करून तुम्ही डिमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट एकदम फ्री मध्ये ओपन करू शकता.
Click Open Free Demat Account – Angel One

डिमॅट व ट्रेडिंग अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते. What documents are required to open a demat account? 

  • पॅन कार्ड 
  • आधार कार्ड मोबाईल नंबर जोडलेला असावा 
  • मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स 
  • सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट 
  • फोटो 
या कागदपत्रांची तुम्हाला आवश्यकता डिमॅट अकाउंट काढण्यासाठी लागत असते. या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कोणत्याही ब्रोकर Broker कडून तुम्ही डिमॅट अकाउंट काढून घेऊ शकता.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment