पुरेशी झोप न मिळाल्यामुळे अनेक व्याधी निर्माण होतात. शरीराचे चक्र बिघडते आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी पुरेशी झोप महत्त्वाची आहे. हे समजूनही योग्य प्रमाणात घेतली जात नाही. त्यामुळे झोपेचे महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे. हल्लीच्या धावपळीच्या काळात आरोग्यविषयक अनेक तक्रारी समोर येताना दिसत असतात. तरुण वयातच चष्मा लागणे, मधुमेह, सांधेदुखी, झोप न लागने अशा अनेक व्याधी ठाण मांडून बसतात. पुन्हा त्यांना घालवण्यासाठी प्रयत्न करूनही ते साध्य होत नाही तर आज आपण अशाच झोपेच्या आरोग्य विषयी जाणून घेणार आहोत.
जास्तीत जास्त आरोग्याकडे लक्ष द्या तेवढेच विकार दूर राहतील झोप हा प्राणी जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. नाॅरइपिनेफ्रिन मेंदूमधील बहुतेक भाग आपण जागे असता कार्यक्षम ठेवते. मस्तीष्क स्तंभाच्या तळाशी असलेल्या काही पेशींनी पाठविलेल्या संवेदना मुळे झोप येण्यास प्रारंभ होतो. जागे राहण्यासाठी आवश्यक असलेल्या चेतापेशी यांचे कार्य तात्पुरते थांबते. अशा वेळी जागे राहणे अशक्य होते यावेळी रक्तामध्ये अडिनोसिनचे प्रमाण वाढते. झोप यायला लागली आहे असे आपण अशावेळी म्हणतो. झोप न लागणे याचा परिणाम झोपणे आणि जागे होणे या दोन्ही क्रिया चेता उद्भव रसायनामुळे घडत असल्याने आहार व औषधे यामुळे झोपेवर परिणाम होतो.
कॉफी, नाक मोकळे ठेवण्यासाठी घेतलेली नाकात घालण्याची औषधे यामुळे झोप लागत नाही. बऱ्याच ताण कमी करणाऱ्या औषधांमुळे रेम झोपेवर परिणाम होतो. रेम झोपेचा कालावधी कमी होतो अति धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये झोप अत्यंत कमी असते. त्यांच्या रेम झोपेची वेळ सुद्धा कमी असते. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींची तीन ते चार तासांनी झोपमोड होते. निद्रानाश झालेल्या व्यक्ती झोप येण्यासाठी मद्यपान करतात. मद्यपान करणाऱ्या व्यक्ती मधील झोप पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेतील असते.
झोप न येण्याची कारणे व उपाय
रात्री झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ : दुसऱ्या दिवशी महत्त्वाची मीटिंग असणे, क्रेडिट कार्डचे भरमसाठ बिल येणे, वैवाहिक जीवनातील समस्या, वेळेअभावी दुर्लक्षित झालेली कामे अशी झोप न येण्याची अनेक कारणे असू शकतात. या सदरात आपण झोप न लागणे याची कारणे आणि त्याचे दुष्परिणाम सुद्धा पाहणार आहोत.
शारीरिक व मानसिक बदल मुले वयात येताना त्यांच्या शरीरात अनेक प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया होत असतात. त्यात हार्मोन्समध्ये बदल होणे शारीरिक जडण-घडण आणि अशा अनेक गोष्टी घडतात. ज्याने मुलांचे लक्ष विचलित होऊन ते निद्रानाशाचे शिकार होतात. संशोधकांना वयात येणार्या मुलींमध्ये मानसिक व शारीरिक बदलांचा सोबत निद्रानाश होण्याची लक्षणे आढळून आले आहे. पौडांगवस्थेत मुलींमध्ये झोपेच्या समस्या व त्यांच्यामध्ये होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे निर्माण होतात. एका संशोधनानुसार निद्रानाशाची समस्या मुलींच्या मासिक पाळी सुरू होण्याच्या काळात म्हणजेच 11 ते 14 या वयात दिसून येते. तर एका संशोधनानुसार मासिक पाळीच्या काळात मुलींमध्ये हे प्रमाण 2.75 पट वाढलेल्या आढळले आहे. मुलांमध्ये या प्रकारचा निद्रानाश बऱ्याचदा वयोमानानुसार बदलतो हळूहळू गोष्टी पूर्ववत होतात मात्र चुकीच्या सवयी अंगीकरल्यास मात्र निद्रा न येणे हा विकार होऊन बसतो.
अन्य आजार आणि जीवन शैली कर्करोगाच्या रुग्णांना मध्ये झोपेची समस्या दिसून येतात. कर्करोगावरील उपचार यांची कमतरता, पुन्हा कर्करोग होण्याची भीती, मानसिक अस्वास्थ्य, कर्करोगामुळे कार्यक्षमता कमी होते, सुरक्षेच्या समस्या, औषधांचा गैरवापर व दुरुपयोग, नातेसंबंधातील ताण, उपचारांसाठी होणारा खर्च यामुळे झोप कमी लागण्याची समस्या निर्माण होते. फक्त कर्करोग नाही तर अन्य सगळ्याच आजारांमध्ये रुग्णाच्या मनात भीती आणि काळजी घर केलेले असते. त्यानेच झोप न येणे हे देखील एक व्याधी बनते. कार्पोरेट जगातील ताणामुळे देखील तुम्हाला झोप कमी येण्याची समस्या होऊ शकते. दिवसभरातील कामाच्या ठिकाणी असणारा ताण, रात्री उशिरापर्यंत काम करणे, खूप वेळ टीव्ही पाहणे, सकाळी लवकर उठणे व पुन्हा रात्री एखाद्या पार्टीला जाणे, रात्रभर व्हाट्सअप वर गप्पा मारणे यामुळे झोप कमी मिळते.
मोबाईल गॅजेट्स किंवा स्क्रीनवर वेळ घालवणे ही गोष्ट तर सर्वश्रुतच आहे. की डिजिटल स्क्रीन समोर जास्त वेळ असल्याने झोपेचा त्रास होतो. रात्री झोपताना फोनचा वापर कमी करावा बराच वेळ फोनचा वापर करुन झोपण्याचा प्रयत्न केल्यास लवकर झोप लागत नाही. त्यासाठी प्रखर प्रकाश डोळ्यांवर सरळ पडू देऊ नये त्याने डोळे कोरडे पडतात परिणामी चष्मा लागणे डोळे दुखणे वगैरे गोष्टी चालू होता स्मार्टफोन्स आणि कॉम्प्युटर यामधून निघणाऱ्या कुत्रे प्रकाशामुळे झोपे मध्ये येतो संशोधकांना सर डोळ्यांचे पेशी कृत्रिम प्रकाशाच्या संपर्कात आल्यास शरीराचे जैविक घड्याळ चुकते त्यामुळे आपले दैनिक चक्र बिघडते त्याचा परिणाम अर्थातच आरोग्यावर होतो.
मोबाईल गॅजेट्स किंवा अन्य गोष्टी यांचा मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम सर्वांनाच माहीत आहेत. आपल्या दिनचर्येत बदल करून आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. झोप हि शरीरासाठी आवश्यक आहेच. पण ती आपल्याला वरदान आहे मात्र धावपळीच्या जगात प्रभाव कशावर पडला असेल तर झोपेवर झोपेच्या वेळा बिघडल्या आहेत. आपल्या स्मरणशक्तीसाठी किंवा मेंदूच्या इतर कार्यासाठी सुद्धा शांत व पुरेशी झोप आवश्यक असते.शरीराच्या अवयवांना आणि मेंदूला ताजेतवाने ठेवण्यासाठी शांत पुरेशी झोप आवश्यक असते.
झोप येण्यासाठी काही सोपे उपाय / Here are some simple steps you can take to begin the process of preparation for mediation :
झोपण्यापूर्वी जास्त जेवण करू नये. जास्त जेवल्यास शरीराचे तापमान वाढते. आणि झोप येत नाही याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही कमी जेवण करावे. रात्रीच्या जेवणानंतर केळी खाणे चांगले राहील. केळीत ट्रिपटोफोन नावाचे ॲमिनो ॲसिड आढळून येते. हे आम्ल शरीरात सेरोटोनिन हार्मोनच्या उत्सर्जनासाठी सहाय्यभूत आहे. ते मेंदू आणि शरीर शांत करते. चहा-कॉफीचे हि सेवन कमी करावे.
रात्रीच्या वेळी तीव्र प्रकाश असल्यास झोप येत नाही. खरे तर कमी प्रकाशात मेलाटोनिन नावाच्या हार्मोनचा स्राव होतो. या हार्मोनमुळे झोप येते त्यामुळे प्रकाश कमी ठेवावा. प्रकाश कमी ठेवल्यास झोप लागण्यास मदत होते.
मानसिक तणाव आणि थकवा पोटखराब असणे, दिनचर्या आरोग्य असणे, झोपण्या उठण्याच्या, खाण्यापिण्याचा निश्चित वेळा नसणे. ही झोप न येण्याची कारणं आहेत म्हणून या गोष्टी नेहमी टाळाव्यात.
रात्री कोमट दूध प्यावे. पुदिन्याची पाने पाण्यात उकळून प्यायल्यास त्याने शांत झोप लागते.
झोपेच्या आरोग्यासाठी / For sleep health
जड पदार्थ खाणे टाळा रूदयात जळजळ होत असल्यास शरीराचा वरच्या भागा खाली उशी घ्या. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल मधुमेह रात्री अंगाला घाम येणे, वारंवार लघवीला होणे, पाय दुखणे, रक्तात साखरेचे प्रमाण कमी असणे या मधुमेहातील समस्येमुळे रात्री कमी झोप लागते. या समस्यांमध्ये टाॅन्सिल्सची वाढ अथवा घशातील मांसल भागात वाढ झाल्याने श्वसन समस्या निर्माण होतात. यामध्ये थकवा, कमी झोप, लक्ष देणे अथवा एकाग्र करणे यामध्ये समस्या होणे ही लक्षणे आढळतात.