ज्वारीच्या भाकरीचे महत्व व फायदे : Importance and benefits of sorghum bread

ज्वारी भाकरी फायदे

जेवणात का खावी ज्वारीची भाकरी?

 • ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेटसचे प्रमाण जास्त असल्याने शरीरात पटकन ऊर्जा मिळते कमी खाऊन पोट भरल्याची जाणीव होते.
 • ज्वारीमध्ये असणाऱ्या अमायनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात तसेच फायबर असल्याने अन्नाचे सहज पचन होते.
 • बुद्ध कोष्टतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही.
 • तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी तर नक्कीच ज्वारीची भाकरी खावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.
 • ज्वारी मध्ये असणाऱ्या निएॅसिनमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. 
 • तसेच ज्वारी मधील फायटो केमिकल्स मुळे हृदय रोग टाळता येतात ज्वारी मधल्या पोटॅशियम मॅग्नेशियम आणि मिनरल्समुळे रक्तदाब/ ब्लडप्रेशर नियंत्रणात राहतो.
 • भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना ज्वारीची भाकरी खाल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत चांगली होते.

ज्वारीच्या भाकरीचे फायदे कोणते?

 1. ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थामुळे पोट साफ राहते. 
 2. ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी कायदेशीर ठरते.
 3. ज्वारी मुळे पोटाचे विकार कमी होतात.
 4. रक्त वाहिन्यांतील कोलेस्टेराॅलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.
 5. हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.
 6. शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास तसेच इतरांनाही ज्वारीची भाकरी उपयुक्त ठरते.
 7. शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास सुद्धा फायदा होतो.
 8. महिलांच्या गर्भाशयाचे आजार प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्या ज्वारी उपयोगाची आहे.
 9. ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.
 10. शौचास साफ होण्यासाठी ज्वारी अतिशय उपयोगी आहे.
 11. काविळीच्या आजारात पचायला हलक्या अन्नाची आवश्यकता असते त्यामुळे काविळीच्या आजारांमध्ये व नंतर वर्षभर ज्वारीच्या भाकरी चे नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरते.
ज्वारीचे भाकरी खाण्याचे फायदे 
ज्वारीला दररोजच्या आहारात प्राधान्य द्या आणि गव्हाचं सणावाराला उपयोग करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment