जैवविविधता माहिती मराठी Biodiversity Information Marathi
जैव विविधता माहिती मराठी |
निसर्गात सजीवांच्या (वनस्पती व प्राणी) असंख्य जाती व उपजाती आढळतात यामुळे जीव संस्था व जीवविविधता या दोन्ही अंगांनी जीवावरण समृद्ध बनले आहे. जिवावरणाची ही समृद्धी म्हणजेच जैवविविधता होय
जैवविविधतेचे महत्त्व The importance of biodiversity
निसर्गातील जैवविविधता आणि जीवांचे परस्परावलंबित्व हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. याचे संपूर्ण ज्ञान माणसाला आजवर झालेले नाही. ही जैवविविधता मानवी जीवनाला उपयुक्त आहे. अन्नसाखळी व अन्नजाळे हे घटक जैवविविधतेशी निगडित आहेत. जैवविविधतेचे रक्षण होण्याने परिसंस्थेतील समतोल टिकून राहतो.
जैवविविधतेच्या ऱ्हासाची कारणे Causes of biodiversity loss
(1) जीवसृष्टीच्या उत्क्रांती प्रक्रियेत काही जीव कायमचे नष्ट झालेले आहेत. उदाहरणार्थ : डायनासोर हे महाकाय प्राणी. (2) तंत्रज्ञानाच्या विकासामुळे झालेली मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपाची माहिती वाढती तीव्रता (3) माणसाची सुख-समृद्धीची न थांबणारी हाव व त्यातून निर्माण झालेला साधनसंपत्तीचा बेसुमार व अविवेकी वापर.
पृथ्वीवरून नामशेष झालेले जीव
डायनोसॉर – एक महाकाय प्राणी
डोडो – मादागास्करमधील एक पक्षी