टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने खास ऑफर ची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना प्रीपेड प्लॅन्स वर 20 टक्के कॅश बॅक देत आहे. मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने युजरसाठी खास ऑफर ची घोषणा केली आहे. कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि माय जिओ ॲप वर ही ऑफर लिस्ट करण्यात आलेली आहे अंतर्गत कंपनी ग्राहकांना रिचार्ज वर देत आहे 20% कॅशबॅक ऑफर
जिओच्या 20% ऑफर चा असा घेऊ शकता तुम्ही फायदा
तुम्हाला कॅशबॅक मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर माय जिओ ॲप किंवा जियो साइटच्या माध्यमातून करावा लागणार आहे.
तुमच्या रिचार्जची किंमत हे 200 रुपयांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
जिओ युजर्स 20% कॅशबॅक चा वापर पुढील रिचार्जच्या वेळी करू शकतात.
तसेच तुमची कॅशबॅक अमाऊंट किँवा पॉईंट्सचा वापर Ajio, JioMart येथे करता येतो.