आवळ्याचे औषधी उपयोग / Medicinal use of amla
१ ) आवळा मानवी आरोग्यासाठी अत्यंत आरोग्यदायी आहे. यासाठी भारतीय आयुर्वेद शास्त्र आणि युनानी प्रणालीच्या प्रसिद्ध औषधांमध्ये आवळ्याचा वापर प्रामुख्याने केला जातो. च्यवनप्राशसारख्या रसायन औषधे मध्ये आहे प्रमुख औषधी द्रव्य आहे.
२ ) आवळ्या मध्ये विटामिन सी आणि लोह यांचे प्रमाण भरपूर आहे. आवळ्यात असणारे महत्त्वाचे कार्यकारी घटक जसे की टॅनिन्स,फ्लेवोनाईडस् सॅपोनिन असे पोषण घटक हे शरीरात विविध कार्य करतात. तसेच शरीराची झीज भरून निघण्यास मदत होते.
३ ) कोरोना काळात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवणे आवश्यक आहे. यासाठी या वयातील औषधी गुणधर्म उपयुक्त ठरतात.बद्धकोष्टता असणाऱ्यांमध्ये आवळा चूर्ण किंवा कच्चा आवळा पचनक्रिया चांगली करण्यास मदत करतो. आवळ्यात भरपूर प्रमाणात फायबर असते. जे पोट साफ करायला मदत करते.तसेच पंचरसांनीयुक्त आवळा हा पचन संस्थेतील आमाचा निचरा करून त्यांची कार्यक्षमता वाढवते.
४ ) मासिक पाळीचा महिला आरोग्याशी निकटचा संबंध असतो. मासिक पाळी चे केवळ प्रजोत्पादनच नाही तर विषारी घटक बाहेर टाकणे हेही असते.मासिक पाळी दरम्यान आवळ्यासह मंजिष्ठा, कडुलिंब व हळद यांचे चाटण स्वरुपात केल्यास अत्यंत लाभदायी ठरते.