Chhatrapati Shivaji Maharaj jayanti information in Marathi : शिवजयंती अर्थात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव महाराष्ट्रात एखाद्या मोठ्या सणाप्रमाणे साजरा केला जातो. भारतात महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी छोट्या प्रमाणावर शिवजयंती साजरी केली जाते. मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 रोजी म्हणजे शुक्रवार 19 फेब्रुवारी 1930 ला पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. हा दिवस म्हणजे शिवजयंती अथवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त जाणून घेऊया शिवजयंती माहिती
छत्रपती शिवाजी महाराज जयंती माहिती मराठी Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Information Marathi
छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण-उत्सव आहे. हा सण मराठी साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी सुद्धा असते. महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.
शिवजयंती कशी साजरी करावी याबाबत समाजात मतांतरे आढळतात. सध्या तरी सार्वजनिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवाजी महाराजांची गाणी एकने, शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर करणे, सार्वजनिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे, सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन, राजकीय पक्षांचे भव्य दिव्य कार्यक्रम, बाईक रॅली, सार्वजनिक ठिकाणी भव्य मिरवणुका काढून, एकमेकांना शिवाजी महाराजांचे सुविचार पाठवून, शिवाजी महाराजांची पुस्तके भेट देऊन, शिवाजी महाराजांच्या आधारित नाटक पथनाट्याचे आयोजन करून, राजमाता जिजाबाई आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन आणि त्रिवार मुजरा करून, महाराष्ट्राच्या इतिहासावर आधारित भव्यदिव्य व्याख्यान मालांचे आयोजित करून अथवा रक्तदाना सारखे सामाजिक कार्यक्रम करून छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव महाराष्ट्रात साजरा केला जातो. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यांचा आलेख पाहता शिवजयंती चे महत्व या मोजक्या कार्यक्रमांपुरतेच मर्यादित नक्कीच नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यामागचा उद्देश असा की शिवाजी महाराजांचे विचार समाजातल्या प्रत्येकांपर्यंत पोहोचवावेत.