आज आपण छत्रपति शिवाजी महाराजांची आग्रा भेट व मोगलांच्या नजरकैदेतून सुटका कशी झाली या विषयी माहिती पाहणार आहोत. ( 1666 )
पुरंदरच्या तहानंतर महाराजांनी उत्तरेत औरंगजेबाच्या भेटीत जावे, अशी मिर्झाराजा जयसिंगाची इच्छा होती. महाराज मोगलांविरुद्ध विजापूरची हातमिळवणी करतील, असे जयसिंगाना भीती होती. या पार्श्वभूमीवर राजांची आग्राभेट ठरली. तत्पूर्वी कारभाराची सूत्रे जिजाबाईंकडे सोपवण्यात आली व त्यांच्या मदतीस मोरोपंत पिंगळे, निळोपंत मुजुमदार व प्रतापराव गुजर यांना नेमण्यात आले. महाराजांबरोबर राजपुत्र संभाजीही आग्र्याला गेले होते.
आग्रा येथे औरंगजेबाने महाराजांना आपल्या दरबारात अपमानास्पद वागणूक दिली. एवढेच नव्हे तर विश्वासघाताने त्यांनी महाराजांना त्यांच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवले. ( आग्रा येथे जयसिंग पुत्र रामसिंग चव्हाण यांच्या हवेलीत राजा राहत होते. ) परंतु आग्रा येथील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून युक्ती, साहस व योजकता यांच्या जोरावर राजांनी मिठाईच्या पेटार्यातून बसून स्वतःची व राजपुत्र संभाजीची ही नजरकैदेतून सुटका करून घेतली. आग्रा येथून यशस्वीपणे निसटून दख्खनमध्ये रायगड येथे येण्यात राजांनी यश मिळविले.
( अग्र्याहून सुटका : 17 ऑगस्ट, 1966. रायगड येथे आगमन : 12 सप्टेंबर, 1666.)