चालू आठवडा हा भारतीय शेअर बाजारासाठी / Indian stock market अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे ट्रेडिंग करण्याआधी तुम्ही खाली दिलेली ही महत्त्वाची माहिती नक्की वाचा.
18 मार्च रोजी होळी निमित्त बाजारपेठा बंद राहतील त्यामुळे या आठवड्यात केवळ चार दिवस ट्रेडिंग Trading असेल त्यामुळे याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे.
तसेच तुम्ही तर पाहतच असाल की ….. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचा व्याजदरांबाबतच्या निर्णय आणि देशांतर्गत आघाडीवरील महागाईची आकडेवारी शेअर बाजाराची दिशा ठरवेल अशी विश्लेषकांची अपेक्षा आहे.
बाजारातील अस्थिरता तूर्त तरी कायम राहणार असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे त्यामुळे याबाबत फेडरल ओपन मार्केट कमिटीची बैठक रशिया …. संघर्ष बाजारासाठी महत्त्वपूर्ण जागतिक घटक असतील असे स्पष्ट केले आहे.
फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या बैठकीचे निकाल 16 मार्च रोजी येतील. यामध्ये कच्च्या तेलाच्या किमती आणि परदेशी गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरेल आणि महागाईची आकडेवारी आज 14 मार्चला येईल.
आज सोमवारी औद्योगिक उत्पादन डेटावर बाजारातील सहभागी प्रक्रिया देतील त्याच प्रमाणे ग्राहक किंमत निर्देशांक आणि घाऊक किंमत निर्देशांक यावर आधारित महागाईची आकडेवारीही येणार आहे. युएस मध्यवर्ती बँकेच्या बैठकीचे निकाल 16 मार्च रोजी जाहीर होतील. सर्वांच्या नजरा त्यांच्यावर असतील.
Today’s stock market information