घर बसल्या नोंदवा मतदार यादीत आपले नाव, मतदार यादीत ऑनलाईन नाव नोंदणी जाणुन घ्या सर्व प्रक्रिया

तुम्ही आता घरबसल्या नोंदवू शकता मतदार यादीत आपले नाव online voter registration

मतदार यादीत नाव नोंदणीची सुविधा ॲप मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. त्या ॲपद्वारे निवडणूक आयोगाच्या मतदारनोंदणी संकेतस्थळाच्या लिंक द्वारे मतदार नोंदणी ही तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून करू शकतात व पत्यातही दुरुस्ती करता येण्याची सुविधा या ॲपमध्ये उपलब्ध आहे.
भारत निवडणूक आयोगा तर्फे 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे असे त्यांनी जाहीर केलेले आहे व त्या निमित्त तुम्हाला 01 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणार्‍यांना मतदार यादीत नाव नोंदविता येऊ शकते. असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
मोबाईल ॲप ट्रू व्होटर (true voter) च्या माध्यमातून जास्तीत जास्त पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविता तसेच नावांत व पत्त्यात काही बदल करायचा असल्यास तुम्ही या ॲपच्या माध्यमातून करू शकता. असे आव्हान मदान यांनी केले आहे.
तुम्ही मतदार नोंदणी ही वेबसाईट च्या माध्यमातून सुद्धा करू शकता.

मतदार नोंदणी आता ऑनलाइन पहा इथे how to apply online registration of voter

भारतीय राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार दिलेला आहे व हा अधिकार त्यांना बजावण्यासाठी प्रत्येक नागरिकांन भारतीय निवडणूक आयोगातर्फे एक निवडणूक ओळखपत्र दिले जाते. जाणून घ्या कशी करता येईल ऑनलाइन मतदार नोंदणी
निवडणूक आयोग गाणं इच्छुकांना ऑनलाईन अर्ज करता यावा यासाठी निवडणूक आयोगाने एक वेबसाईट सुद्धा सुरू केलेले आहे. 
तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
नंतर तुम्हाला पुढे  Apply online for registration of new voter वर क्लिक करा.
तुमची माहिती भरा.
नंतर क्लिक केल्यानंतर समोर एक फॉर्म ओपन होईल
त्या फार्मवरील महत्त्वाची माहिती भरायची आहे. तुमचे नाव, पत्ता, विधानसभा क्षेत्र यांसारखी माहिती तुम्ही त्या ठिकाणी अचूक माहिती भरा.
नंतर पुढे नवीन नाव नोंदणी साठी फॉर्म 6 सोबत फोटो, जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा, फोटो ओळखपत्राच्या ॲटेस्टेड प्रती जोडणे म्हणजेच वेबसाईटवर अपलोड करणे अत्यंत आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स नंबर दिला जाईल. त्याच्या मदतीनं नाव अर्जाच्या स्थितीची माहिती थेट तुम्ही याच संकेतस्थळावर भेट देऊन समजू शकतात.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment