शिखांचे प्रमुख गुरु व शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव एक महापुरुष आणि महान धर्म प्रवर्तक म्हणून ते अत्यंत पूजनीय आहेत. समस्त विश्वातील अज्ञानता दुरु करून आध्यात्मिक शक्तीला आत्मसात करण्याकरिता त्यांनी प्रेरित केले आहे.Gurpurab
Guru nanak jayanti information in marathi
कार्तिक पौर्णिमेला येणारी गुरू नानक देव यांची जयंती प्रकाश पूर्व म्हणूनही साजरी केली जाते. शीख धर्माची शिकवण देणाऱ्या गुरुनानक यांचे चिंतन धर्माचे सत्य व शाश्वत मूल्यांचे मूळ होते.
गुरू नानक गुरपरब किंवा गुरुनानक जयंती पहिल्या शिख गुरु, सिंधी गुरु यांचे वाढदिवस साजरा करण्याचे सण आहेत. हा सर्वात पवित्र सण शिख, सिंधी लोकांचा आहे. नानक यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातील लाहौर जवळ तळवंडी येथे 15 एप्रिल 1469 रोजी एका हिंदू कुटुंबात झालेला आहे. या गावाला आता ननकाना साहिब असे म्हटले जाते. देशभर गुरुनानक यांचा जन्मदिन प्रकाश दिन म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.
गुरुनानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मूल्यांचे मूळ होते. म्हणूनच जात-धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती. एकदा बेई नदीतून स्नान केल्यानंतर बाहेर आल्यावर त्यांनी कुणीहि हिंदू नाही आणि कुणी मुसलमान नाही सर्वजण मानव आहोत, असा नारा दिला होता. बनविणारा एकच इश्वर आहे. असे त्यांचे म्हणणे होते. धर्म हे दर्शन आहे, दिखावा नाही, अशी त्यांची धारणा होती.
त्यासाठी अनेक केंद्रांची साखळी निर्माण केली. त्यांनी एकत , श्रद्धा व प्रेमाचे तत्त्वज्ञान मांडले. ते क्रांतिकारी विचारांचे होते. त्यांनी नवीन विचारधारेचा प्रचार केला.
गुरुनानक जयंती च्या शुभेच्छा प्रिय जनांना पाठवा खास मराठी संदेश Guru Nanak Jayanti Wishes in Marathi
- वाहेगुरू जी का खालसा वाहेगुरू जी की फतेह गुरुनानक जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा!
- कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही सर्वजण मानव आहोत असा संदेश देणारे गुरू नानक देव यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
- शीख धर्माचे संस्थापक आणि आद्य गुरु गुरुनानक जयंती दिनी सर्व शिख बंधू भगिनींना शुभेच्छा!
- शीख बांधवांचे आद्य गुरु गुरु नानक यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी शुभेच्छा!
- जगाला श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे गुरू नानक यांच्या जयंती च्या मनपूर्वक शुभेच्छा!
- सर्व शीख बांधवांना गुरुनानक जयंती च्या खूप खूप शुभेच्छा!