Monday, October 2, 2023
Homenewsगणपतीची पूजा कशी करावी | श्री गणपती पूजा विधी/माहिती ...

गणपतीची पूजा कशी करावी | श्री गणपती पूजा विधी/माहिती | अशी करा गणेशाची प्राणप्रतिष्ठा

गणेश स्थापना मुहूर्त कोणता?

गणेश स्थापना हे तिथी प्रधान व्रत असल्यामुळे भाद्रपद शु चतुर्थी दिवसभरात कधीही पण शक्यतो सूर्योदयापासून मध्यान्ही पर्यंत कधीही स्थापना करता येते उशीर होणार असेल तर दुपारपर्यंत संकल्प करून दुपारी स्थापना झाली तरी चालेल त्यासाठी विशिष्ट नक्षत्र योग स्थिर राशींचा कालावधी भद्रा चौघडिया मुहूर्त इत्यादी पाहण्याची गरज नाही.

घरातील महिला गर्भवती असल्यामुळे मूर्ती विसर्जन करावे की नाही?

याला काहीही शास्त्रीय आधार नाही आपल्या घरात नवीन बाळाचे आगमन होणार असते अशा वेळेस सर्वांचे मने हळवी झालेली असतात व त्यावेळी गणेशाचे बालरूप कसे विसर्जित करावे असा भोळा समाज त्यामागे आहे.

अशौच (सोयर व सुतक) आल्यास गणपती नंतर बसवला तर चालेल का?

पार्थिव गणपती पूजन हे व्रत आहे कुलाचार नाही त्याचा एखाद्या वर्षी लोप झाला तरी चालतो पुढील वर्षी बसवता येतो पार्थिव गणेश स्थापना करण्याचा भाद्रपद शु चतुर्थी हा एकच दिवस असल्याने त्या दिवशी जमले नाही किंवा चतुर्थीपूर्वी अशौच संपत नसेल तर त्या वर्षी गणपती बसू नये येथे स्थापना दिवस महत्त्वाचा असल्यामुळे पुढे कोणत्याही दिवशी स्थापना करता येणार नाही.

यावर्षी कोरोणामुळे गावी दहा दिवस थांबता येणार नाही तर पाच दिवसात विसर्जन केले तर चालेल का? 

अडचणीच्या काळात दीड दिवस पाच सात दिवसात विसर्जन करू शकता गणेश स्थापना झाल्यावरच अशौच आले तर लगेच दुसऱ्या व्यक्तीकडून गणेश विसर्जन करून घ्यावे अशौच आल्यावर घरात पार्थिव गणपति ठेवू नये.

मागील वर्षी आम्ही बसलेली गणेश मूर्ती भंगली होती मग आम्ही नवीन आणून बसवली ती योग्य आहे का?

गणेश स्थापनेनंतर मूर्ती भंगली तर लगेच विसर्जन करावे दुसरी मूर्ती आणून परत प्रतिष्ठा करू नये जर प्रतिष्ठा होण्यापूर्वी मूर्ती भंगली तर मात्र नवीन आणून बसू शकता.

आमचे वडील स्वर्गवासी झाले पण सव्वा महिना झाला नाही तर गणपती बसवावा का? 

14 दिवस झाल्यावर उदक शांती झाल्यावर सर्व व्रते देवकार्य करता येते त्यामुळे आरास न करता साध्या पद्धतीने व भक्तिभावाने गणेश स्थापना करावी.


पार्थिव गणेश मूर्तीचा आकार किती असावा?

घरी मातीची मूर्ती स्वतः तयार करून त्याची प्रतिष्ठा व पूजा करावी व ती मूर्ती वाहत्या पाण्यात जलाशयात विसर्जित करावी असा विधी आहे त्यामुळे त्याबद्दलचे विशिष्ट नियम नाहीत.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments