Wednesday, September 27, 2023
HomeHistoryख्रिसमस नाताळ माहिती मराठी Christmas day information in Marathi

ख्रिसमस नाताळ माहिती मराठी Christmas day information in Marathi

Christmas Day : नाताळ हा दिवस एक प्रमुख ख्रिस्ती सण म्हणून तो दरवर्षीप्रमाणे 25 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर हा नाताळ साजरा केला जातो. काही ठिकाणी या सणाऐवजी एपी फणी सण 6, 7 किंवा 19 जानेवारीला सुद्धा साजरा केला जातो.

हा दिवस जगाच्या बर्‍याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो. तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. इसाई बांधव या सणाला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. देश-विदेशात आणि आपल्या भारतात या सणा दरम्यान नागरिकांचा हा एक प्रकारचा वेगळाच उत्साह आपल्याला पाहायला मिळत असतो.
या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध प्रकारच्या भेटवस्तू, नाताळ शुभेच्छा पत्र देऊन परस्परांचे अभिनंदन करत असतात. तसेच आपापल्या घरांना रोषणाई, दिवे लावून घर हे सजवले जाते. ख्रिसमस वृक्ष सजावट (क्रिसमस ट्री – नाताळसाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) या सणाचा एक महत्त्वाचा/अविभाज्य घटक आहे. या सणा दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी अनेक प्रकारच्या भेटवस्तू वाटत असतो असे मानले जाते. यामध्ये चॉकलेट, केक इत्यादी अशा वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनविले जातात. 

ख्रिसमस नाताळ माहिती मराठी Christmas day information in marathi

नाताळ म्हणजेच ख्रिसमसच्या दिवशी आपल्या अंगणात क्रिसमस ट्री लावल्या जातात. त्याला एक चांगल्या प्रकारचे रुप दिलं जातं घरावर चांगल्या प्रकारचे रोषणाई सुद्धा केली जाते. या दिवशी केकचे विशेष महत्त्व असते आलेल्यांना केक भरवणे फार जुनी परंपरा एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात.
नाताळ/Khrismas tree हा शब्द नातूस म्हणजेच जन्म या लॅटिन शब्दापासून बनला आहे. या दिवसाला इंग्रजी भाषेत ख्रिसमस म्हणतात. ख्रिसमस म्हणजे ख्रिस्त महायज्ञ. ख्रिस्त महा गुरूंना ख्रिसमसच्या दिवशी तीन मिस्सा अर्पण करण्याची परवानगी दिली गेली. ख्रिस्ताचा जन्म घटकेचे स्मरणार्थ पहिला मिस्सा मध्यरात्री अर्पण केला जातो. ख्रिस्ताचा जन्म मध्यरात्री झाला अशी मान्यता आहे.

ख्रिसमस इतिहास history of Christmas in Marathi

चार्ल मेगन या राजाचा राज्याभिषेक 25 डिसेंबर इ.स 800 आहे. त्या दिवसापासून हा विशिष्ट दिवस म्हणून साजरा करण्याचे महत्त्व विशेष वाढलेले आहे. मध्ययुगाच्या काळात या दिवसाला सुट्टीचे महत्त्व सुद्धा प्राप्त झाल्याचे दिसून येते या काळात नाताळ हा एक दिवस सार्वजनिक उत्सव बनलेला आहे. यामध्ये भेटवस्तू देणे हे त्यावेळी मालक सेवक यांच्या पुरतेच मर्यादित होते असे म्हटले गेले आहे.सतराव्या शतकात या दिवशी गायन वादन नृत्य भोजनाचा आस्वाद अशा गोष्टी या ठिकाणी आनंदाचा भाग म्हणून केला जाऊ लागल्या होत्या. सतराव्या शतकातच काही विशिष्ट समाज गटाने या संस्थांवर बंदी आणण्याचे आपल्याला अनेक पुस्तकांच्या माध्यमातून दिसून येत आहे.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments