Wednesday, September 27, 2023
HomeUncategorizedखारे शेंगदाणे रेसिपी मराठी | Salted Peanut Recipe Marathi

खारे शेंगदाणे रेसिपी मराठी | Salted Peanut Recipe Marathi

Salted Peanut Recipe Marathi : आज आपण खारे शेंगदाणे कशा पद्धतीने बनवले जातात याचे आपण आज रेसिपी पाहणार आहोत ती रेसिपी पुढील प्रमाणे…

नावाप्रमाणेच खारे शेंगदाणे हे शेंगदाणे आणि मिठापासून बनवलेली एक सोपी आणि पौष्टिक स्नॅक रेसिपी आहे. प्रौढ आणि मुलांसाठी हा एक पौष्टिक नाश्ता आहे शेंगदाण्यात ॲटीऑक्सिडंटस, प्रथिने आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स जास्त असतात हे सर्व हृदयाचे आरोग्य रक्ताचे शुद्धता आणि एकंदर फिटनेस साठी फायदेशीर असतात. 
ही रेसिपी तुम्ही घरीही करू शकता यासाठी कृती पुढीलप्रमाणे khare shengdane recipe
  • सर्वात आधी दोन कप पाणी घेऊन त्याला उकळी आणा आणि मग त्यात मीठ घाला.
  • नंतर या पाण्यात शेंगदाणे घाला.
  • थोड्या वेळाने पातेले खाली उतरवून ठेवा आणि शेंगदाण्यांमध्ये मीठ चांगलं मुरु द्या साधारण दहा मिनिटे बाजूला ठेवा मग ते गाळून घ्या आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
  • आता कोरड्या कढईत पुन्हा मीठ घ्या आणि त्यात ते शेंगदाणे घाला.
  • या मीठात शेंगदाणे चांगले भाजून घ्या ते उच्च आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  • हे करण्यासाठी किमान पंधरा मिनिटे तरी आरामात लागतातच.
  • त्यानंतर ते चोळा आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
  • अगदी दुकानातल्या सारखे खारे शेंगदाणे तयार आहेत.
खारे शेंगदाणे बनवण्याची जुनी पद्धत recipe in Marathi
कढईत अथवा तव्यावर मंद आचेवर शेंगदाणे भाजत राहावे हळुवार हलवत कोणताही डाग पडू देऊ नये, खरपूस वास व हाताने एक चोळून पाहावा पटकन वरील सालपट निघून तसेच तोंडात टाकून बघावे एकदम दाताखाली चावताना कडकपणा असेल तर एक वाटी शेंगदाणे असतील तर पोहेचा सपाट चमचा बारीक मीठ वाटीत घ्यावे व त्यात त्याचे चमच्याने गच्च भरून तीन चमचे पाणी घालावे एकजीव करावे पाण्यात मीठ विरघळले की त्या भाजत असलेल्या शेंगदाण्यावर टाकावे व हलवून घ्यावे अगदी पांढरे शुभ्र व खडक अगदी हाताने चोळल्यास दोन पाकळ्या तोंडात टाकतात खरपूस व खुसखुशीत लागले पाहिजे नंतर आच बंद करावे व गार होऊ द्यावे झाले तुमचे हे खारे शेंगदाणे…
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments