कोजागरी पौर्णिमा आश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय बौद्ध धर्म संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार कोजागिरी पौर्णिमा सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात असते कृषी संस्कृतीत या सणाला विशेष महत्त्व दिले जाते. या पौर्णिमेला मानिकेथारी असेही संबोधले जाते.
अश्विन महिन्यात येणार्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा व शरद पौर्णिमा असेही म्हटले जाते. आरोग्याच्या दृष्टीने या पौर्णिमेला आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे या रात्री बारा वाजे नंतर अमृत पाझरत असल्याने त्याच्या सहवासातील प्रत्येकाला आरोग्याचा लाभ होतो असे मानले गेले आहे.Kojagiri Pournima Information Marathi
कोजागरी पौर्णिमा या दिवशी रात्री लक्ष्मी आणि इंद्र यांची पूजा केली जाते. मध्यरात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जागा आहे. त्याला धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते अशी कथा आहे. या दिवसाचे महत्त्व आणि पूजा विधी या लेखातून समजून घेऊया.Kojagiri Pournima in Marathi
शरद ऋतूमध्ये हवामानात बरेच बदल घडून येत असतात एकीकडे उन्हाळा संपतो आणि दुसरीकडे हिवाळा सुरू होतो दिवसा गरम आणि रात्री थंडी पडते दूध पिल्यामुळे पित्त प्रकोप कमी होतो याच कारणामुळे बहुतेक पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध पिण्याची प्रथा अनेक गावांनी आहे. कोजागीरीची शीतल चांदणं अंगावर घेतलं की मनःशांती, मनःशक्ती उत्तम आरोग्य लाभतं असे म्हणतात.
कोजागिरी पौर्णिमेचे सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्व Importance of Kojagiri full moon
या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ आपल्याला ओवाळून त्याची किंवा तिची आश्विनी साजरी करतात.
या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि या दिवशी दम्यावर चे आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे. या दिवशी घेतलेल्या औषध लवकर लागू पडते असा समज आहे. या दिवशी पाळावयाच्या व्रताला कोजागरी व्रत म्हणतात. दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी व ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा करावी; या पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दूधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. त्यात बऱ्याच प्रकारच्या गोष्टी घालून हा नैवेद्य तयार करून नैवेद्य दाखविला जातो. देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावेत तसेच ते अत्यं स्वतः सेवन करावेत. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध मग प्राशन केले जाते. अशी आख्यायिका सांगतात की या दिवशी उत्तर रात्री साक्षात लक्ष्मी चंद्र मंडळ आवरून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मीदेवी को जागर्ति असे विचारते.म्हणुन या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी दूत खेळावे असेही सांगितलेले आहे.
चला तर मग कोजागिरी साजरी करूया आणि मसाला दूध पिऊ या