कानिफनाथ महाराज मढी माहिती मराठी Shri Kanifnath Maharaj History and other information

श्री चैतन्य कानिफनाथ महाराज यांची संजीवनी समाधी श्री क्षेत्र मढी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे आहे. नवनाथांपैकी गुरु जालिंदरनाथ हे कानिफनाथांचे गुरु. नाथ संप्रदाय हा साधारणपणे नवव्या व दहाव्या शतकाच्या सुमारास उदयास आले. गुरु मच्छिंद्रनाथ श्री नाथ संप्रदायाचे आद्य शिष्य असले तरी नाथ पंथाला खऱ्या नव्या रूपात आणले ते म्हणजे गुरु गोरक्षनाथांनी.

या ठिकाणी नात भक्तांची व्यवस्था करण्याकरिता कानिफनाथ गडाच्या पायथ्याशी रुमची व्यवस्था ट्रस्टने केलेले आहे त्याच प्रमाणे भाविकांची व्यवस्था सेवा करण्यासाठी कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट मढी सदोदीत वात पाहत आहे.

कानिफनाथ गड Kanifnath Fort  मढी श्री चैतन्य कानिफनाथांच्या गडावर मुख्य गाभाऱ्यामध्ये नाथांची पवित्र संजीवनी समाधी आहे नंतर सभामंडपामध्ये एका बाजूला नाथांचे गादीघर आहे. तेथे नाथ विश्रांती करत समोरच एक होमकुंड आहे. नंतर नाथांच्या गादीघराशेजारीच पूर्वेला श्री भगवान विष्णूचे मंदिर आहे. त्यातील भगवान विष्णूची मूर्ती इतरत्र कोठेही पहावयास मिळत नाही.
नंतर त्याच ठिकाणी समाधी मंदिराच्या दक्षिणेला नवनाथांचे सर्वात मोठे गुरुबंधू श्री मच्छिंद्रनाथ यांचे मंदिर Machhindranath Templeआहे तेथून सरळ पाहिले असता गर्भगिरी पर्वतावरील मच्छिंद्रनाथाच्या मंदिराचे दर्शन भक्तांना त्या ठिकाणी मिळते. समाधी मंदिराच्या पश्चिमेला विठ्ठल रखुमाईचे मंदिर असून मंदिराखाली नाथांचे साधन मंदिर तुम्हाला तेथे पहावयास मिळते. तेथे जाण्याकरीता भुयार मार्ग आहे व तो एक पूर्वीच्या स्थापत्यशास्त्राचा आदर्श नमुना सुद्धा आपल्याला पाहावयास त्या ठिकाणी मिळतो.

फाल्गुन वद्य पंचमीला मढीला कानिफनाथांची यात्रा Kanifnath Yatra  भरते या यात्रेला साधारण दहा ते वीस लाख भाविक महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आदी प्रांतांमधून येत असतात. अठरापगड जातीचे मढी हे पंढरपूर आहे. तेथे त्यांच्या भांडणाचा न्याय-निवाडा होतो. पाडव्याच्या आदल्या दिवशी फुलबाग येथील बाजार प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या जातीचे गाढवाचा बाजार सुद्धा या ठिकाणी भरत असतो. मढीची रेवडी तर प्रेयकाची आवडीची आहे. पाडव्याच्या पहाटे भक्तगण कावडीने पाणी आणून नाथाच्या समाधीला स्नान घालतात व धन्य होतात.
नाथ संप्रदायाचे आद्य स्थान व भटक्यांची पंढरी म्हणून श्री क्षेत्र मढी येथील यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे. या यात्रेत अठरापगड जाती धर्माच्या समाजाला मान दिला जातो. होळी ते गुढीपाडवा अशी पंधरा दिवस ही भव्य यात्रा असते.
ओम चैतन्य कानिफनाथाय नमः

Leave a Comment