Wednesday, September 27, 2023
Homenewsकांदा पिकाची संपूर्ण माहिती मराठी Onion crop information in Marathi

कांदा पिकाची संपूर्ण माहिती मराठी Onion crop information in Marathi

कांदा लागवड माहिती पहा इथे संपूर्ण Onion crop information in Marathi

Onion crop information in Marathi

कांदा रोजच्या आहारात वापरला जाणारा एक महत्त्वाचा पदार्थ आहे व त्यामुळेच तुम्ही पाहत असाल की कांद्याची मागणी ही वर्षभर मोठ्या प्रमाणात असते हा कांदा कधी कधी तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा या कांद्या विषयी आपण आज या लेखामध्ये माहिती पाहणार आहोत.

कांदा लागवडीसाठी चे हवामान व लागवड हंगाम कोणता What is the climate and planting season for onion cultivation?

कांदा हा रब्बी हंगामात लागवड करणे हे जास्त फायद्याचे ठरत असते कांदा लावल्यापासून तुम्ही ते काही दिवस कांद्याला थंड हवामान असते तर त्यानंतर कांद्याची वाढ होत असताना हवामानातील तापमान हे थोडे जास्त असेल तर कांद्याच्या वाडीला त्याचा हा फायदा चांगल्या प्रकारे होत असतो. त्यामुळे कांदा जास्त नोव्हेंबर महिन्याच्या आसपास कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते तर त्या वेळच्या थंडीचा उपयोग होतो आणि जानेवारी महिन्यातील स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे कांदा हा चांगल्या प्रकारे पोसला जात व कांद्याचा आकार सुद्धा हा मोठ्या प्रमाणात होत असतो.
कांदा या महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात व उन्हाळी हंगामात देखील लागवड केलेली दिसते खरीप हंगामात लागवड करताना जून जुलै महिन्यात करावी तर उन्‍हाळी हंगामात कांदा लागवड जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात करावी.

कांद्याची लागवड कशी करावी How to cultivate onions

कांद्याची लागवड ( Onion crop ) वाफा पद्धतीने किंवा सरी पद्धतीने करू शकता व त्या आधी कांद्याचे रोपे तयार करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते गादी वाफे तयार करून त्यामध्ये कांद्याची रोपे तयार करावीत जेथे गादीवाफे तयार करायचे आहे ती जमीन चांगल्याप्रकारे भुसभुशीत नांगरून व कुळवून घ्यावी व मग तिथे 01 मीटर रुंद व 03 मीटर लांब 15 सेंटिमीटर उंच वाफे बनवून घ्यावेत या वाक्याच्या रुंदीशी समांतर अशा 05 सेंटीमीटर बोटाने रेषा पाडाव्यात आणि यात कांद्याचे बी ओळीत पातळ पेरावे व नंतर मातीने झाकून टाकावे बी उगवून येईपर्यंत झारीने पाणी घालावे व कांद्याचे बी त्या ठिकाणी उगवल्यानंतर तुम्ही गरजेप्रमाणे पाटाने सुद्धा पाणी देऊ शकता.
तुमचे हे केलेले कांद्याचे रोप हे जवळपास हरभऱ्याच्या आकाराची चांगल्या प्रकारची गाठ तयार झाली की तुम्ही तो कांदा लागवडीसाठी तयार आहे असे समजू शकतात. खरीप हंगामातील तुम्ही कांद्याची रोपे ही 6 ते 7 आठवड्यान तर रब्बी हंगामात लागवड केलेली रोपे ही 8 ते 9 आठवड्यांनी तयार होतात. रोपे काढण्याआधी 24 तास गादी वाफ्यास पुरेसे पाणी देऊन घ्यावे. त्यामुळे तुम्हाला रोपे काढण्यास अत्यंत सोपे जाते व कांद्याची नास होत नाही व त्यामुळे तुम्ही कांद्याचे रोप सहजरीत्या काढू शकता.

कांद्यावरती कोणकोणत्या प्रकारचे रोग व कीड पडू शकते. What kind of diseases and pests can fall on onions?

कांद्यावर करपा फुलकिडे अशा रोगांचा व किडीचा प्रादुर्भाव आढळतो करपा रोगामुळे कांदा पातीवर लांबट गोल चट्टे पडतात व शेंड्यापासून पाने जळाल्यासारखे दिसतात. फुलकिडे कांदा पातळीवरील तेलकट पृष्ठभागात खरडतात त्यात स्त्रवणारा रस शोषतात त्यामुळे पातीवर पांढरे ठिपके पडतात.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments