उद्योग आधार नंबर कसा काढतात the process of udyog Aadhar registration information in Marathi

उद्योग आधार नंबर कसा काढायचा पहा इथे संपूर्ण माहिती How to draw an Udyog Aadhar number 

जर तुम्ही एक उद्योजक असाल किंवा तुम्हाला एक नवीन उद्योग सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती फक्त तुमच्यासाठी आहे पण या आधी आपल्याला हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की उद्योग आधार (Industry base) नेमकं काय आहे ते का काढणे गरजेचे आहे ते पण तुमच्यासाठी उद्योग आधार (Udyog Aadhar) नंबर कसा प्राप्त कराल त्यासाठी कोणती कागदपत्रे तुमच्याजवळ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि यासाठी तुम्हाला किती खर्च येईल.

उद्योग आधार नंबर म्हणजे काय What is an udyog aadhar number

अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर उद्योग आधार नंबर मिळवणे म्हणजे तुमच्या व्यवसायाची नोंदणी करणे होय. यापूर्वी तुम्ही व्यवसायाची नोंदणी करणे ही खूप जटिल प्रक्रिया समजले जायचे. MSME registration  म्हणजे सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांची नोंदणी केल्यानंतरच केंद्र किंवा राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सर्व योजनांचा हा व्यवसाय धारकाला लाभ घेता येऊ शकतो.

उद्योग आधार कसे काढायचे How to draw an udyog aadhar

उद्योग आधार नंबर मिळवण्याच्या दोन पद्धती आहेत एक तुम्ही जिल्हा उद्योग केंद्र मध्ये जाऊन ऑफलाईन फॉर्म भरू शकता. किंवा Udyam Ragistration या पोर्टलवर जाऊन आपल्या उद्योगाची नोंदणी विनाशुल्क करू शकतात.उद्योग आधार नंबर काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे Document required to extract udyog aadhaar number

 • आधार कार्ड
 • मोबाईल नंबर
 • ई-मेल अकाउंट

उद्योग आधार नंबर साठी ऑनलाईन नोंदणी कशा प्रकारे करायचे How to register online for udyog aadhaar number

 1. सर्वात प्रथम Udyam Ragistration या उद्योगाधार च्या वेबसाईटवर जा.
 2. पहिल्याच पृष्ठावर तुमच्यासमोर खालील प्रमाणे फॉर्म ओपन होईल.
 3. Udyog Aadhar / उद्योग आधार कसे काढावे 

   

 4. त्या रकान्यांमध्ये तुमचा आधार कार्ड नंबर आणि संपूर्ण नाव भरा. 
 5. माहिती भरून झाल्यानंतर Validate and Generate OTP वर क्लिक करा. तुमचा जो मोबाइल क्रमांक तुमच्या आधार कार्ड ची लिंक आहे त्यावर एक OTP क्रमांक येईल. 
 6. तो OTP क्रमांक खाली आलेल्या रकान्यामध्ये भरून व्हेरिफाय करा.
 7. मोबाइलल नंबर व्हेरिफाय झाल्यानंतर खाली अजून काही फॉर्म ओपन होतील जिथे तुम्हाला तुमच्या व्यवसायाची माहिती भरायची आहे. उदाहरणार्थ- व्यवसायाचा पत्ता, पॅन कार्ड, व्यवसायाचे स्वरूप इत्यादी माहिती भरून फॉर्म सबमिट करावा लागेल. 
 8. अशा प्रकारे थोड्याच वेळात तुमचा ईमेल अकाउंट वर उद्योग आधार सर्टिफिकेट रिसीव्ह होईल. त्या सोबत तुम्हाला 12 अंकी ही UAN मिळेल. 
 9. जर तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्ड लिंक नसेल तर एक विंडो ओपन होईल त्यावर ज्या सूचना येतील त्याचे पालन करा आणि माहिती संपूर्ण प्रोसेस पूर्ण झाल्यावर तुमच्या इमेल अकाउंट वर तुमचं उद्योग आधार सर्टिफिकेट मिळेल. अशा या पद्धतीने तुम्ही एकदम सोप्या मार्गाने तुमचे उद्योग रजिस्ट्रेशन करू शकता.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment