ई श्रम कार्ड कोण कोण बनवू शकतो आणि त्याचे फायदे, जाणून घ्‍या संपूर्ण माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले व सरकारच्या माध्यमातुन ई श्रम कार्ड पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे.

ई श्रम कार्ड कोण कोण बनवू शकतात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या माध्यमातून ई श्रम पोर्टल (E-Shram card portal) सुरू करण्यात आलेले आहे. या वेबसाइट किंवा प्लॅटफॉर्म व्दारे असंघटित क्षेत्रातील कामगारांना दोन लाख रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा (Accident insurance) संरक्षण दिले जाईल जे एक वर्षासाठी असेल.
अपघाती मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये देण्यात येणार आहेत. तुम्ही देखील असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर असाल आणि आजपर्यंत तुम्ही ई श्रम कार्डसाठी अर्ज केला नसेल किंवा या कार्ड साठी पात्रता काय असावी याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर आज आपण तुम्हाला हि सर्व प्रकारची माहिती सांगणार आहोत.

नोंदणी साठी वय किती असावे What should be the age for e-labor card registration?

ई श्रम कार्ड साठी वय 16 वर्षांपेक्षा जास्त आणि 59 वर्षापर्यंतचा कोणताही कामगार या ई श्रम पोर्टल वर स्वतःची नोंदणी करू शकतो. या वयामधील कोणतीही व्यक्ती ई श्रम कार्ड बनवू शकते.

ई श्रम कार्डसाठी नोंदणी कशी करायची?How to register an e-shram card

ई श्रम कार्ड काढण्यासाठी कामगारांना आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांकाच्या साह्याने ई श्रम संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. याच बरोबर तुमची जन्मतारीख, मुळगाव, संपर्क क्रमांक आणि सामाजिक श्रेणी यासारखी आवश्यक माहिती ई श्रम संकेतस्थळावर तुम्हाला द्यावी लागेल. नंतर कामगारांना एक बारा अंकी अनोखा क्रमांक असलेले ई श्रम ओळखपत्र दिले जाईल. त्यामध्ये सामाजिक सुरक्षेच्या विविध योजनांचा देखील समावेश करण्यात येणार आहे.

ई श्रम कार्ड नोंदणी कोण करू शकत नाही?

या ई श्रम (E-Shram) पोर्टलवर नोंदणीसाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार आयकर देत नाहीत म्हणजे जर कामगार करदाता असेल तर त्याला ई श्रम  पोर्टल वर नोंदणी करण्याचा अधिकार नाही. फक्त तिथे असाच कामगार नोंदणी करू शकतो, जो EPFO, ESIC किंवा NPS सदस्य नाही.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment